राष्ट्रीय दुखवटा म्हणजे नेमकं काय? तो कोणासाठी व का जाहीर केला जातो? जाणून घ्या सविस्तर

हा राष्ट्रीय दुखवटा म्हणजे नेमकं काय आणि तो कोणासाठी जाहीर केला जातो याबाबत अनेकांना कदाचित माहिती नसेल.

Former President Pranab Mukherjee | (Photo Credit: Twitter)

National Mourning Meaning: भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी (Pranab Mukherjee) यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडालेला आहे. हे दु:ख त्यांच्या जवळच्या लोकांसाठी, राजकीय नेत्यांसाठी, चाहत्यांसाठी आभाळाएवढं आहे. त्यांच्या निधनानंतर काल (31 ऑगस्ट) केंद्र सरकारने 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2020 पर्यंत हा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. राष्ट्रीय दुखवटा (National Mourning) हा शब्द अनेकदा आपण दिग्गज व्यक्तींच्या निधनानंतर ऐकला आहे. हा राष्ट्रीय दुखवटा म्हणजे नेमकं काय आणि तो कोणासाठी जाहीर केला जातो याबाबत अनेकांना कदाचित माहिती नसेल.

राष्ट्रीय दुखवटा म्हणजे एका दिग्गज व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या विषयी शोक व्यक्त करण्यासाठी आणि त्याला आदरपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी केला जाणारा 7 दिवसांचा दुखवटा. देशाच्या प्रमुख संविधानिक पदांवर काम करीत असलेल्या किंवा केलेल्या व्यक्तींच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाल्यास राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकावला जातो. त्यासाठी तो आधी पूर्णपणे वरपर्यंत फडकावून नंतर अर्ध्यावर आणला जातो. राष्ट्रीय दुखवटा जाहीर करताना त्या व्यक्तीचे सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि योगदान लक्षात घेऊनच सरकार याविषयी निर्णय घेते. Pranab Mukherjee Funeral: भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्यावर दिल्लीत दुपारी 2 च्या सुमारास अंत्यसंस्कार

याबाबतचा निर्णय कोण घेतात?

केंद्र पातळीवर केंद्रीय गहमंत्रालय यासंदर्भातील निर्देश जारी करते. राज्यही त्यांच्या प्रदेशात शासकीय दुखवटा जाहीर करु शकतात. राज्यस्तरावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आणि दुखवटा जाहीर करण्यासाठी संबिधित निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा करून घेतात.

राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाल्यावर काय करण्यात येते?

प्रणब मुखर्जी यांच्या आधी गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर एका दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif