Bankura (WB) Railway Accident: पुन्हा एकदा रेल्वे अपघात; पश्चिम बंगालमध्ये बांकुरा स्टेशनवर दोन मालगाड्यांची समोरासमोर धडक (Watch Video)

ही घटना पश्चिम बंगाल राज्यातील बांकुरा येथील ओंडा रेल्वे स्थानकावर घडली. दोन मालगाड्यांची समोरासमोर धडक झाल्याचे वृत्त आहे.

Bankura Railway Accident | (Photo Credits: Twitter/ ANI)

West Bengal Railway Accident: ओडिशा येथील बालासोर रल्वे अपघाताची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा दोन मलगाड्यांची समोरासमोर टक्कर झाल्याची घटना घडली आहे. ही घटना पश्चिम बंगाल राज्यातील बांकुरा (Bankura) येथील ओंडा रेल्वे स्थानकावर (Onda Railway Station घडली. दोन मालगाड्यांची समोरासमोर धडक झाल्याचे वृत्त आहे. दोन मालगाड्या समोरासमोर धडकल्याने खरगपूर-बांकुरा-आद्रा (Kharagpur–Bankura–Adra line) मार्गावरील रेल्वे वाहतूक थांबवण्यात आल्याचे समजते.

अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, एका मालगाडीचा चालक किरकोळ जखमी झाल्याचे समजते. मालगाडी असल्याने जीवित हानी होण्याचे प्रमाण नगण्य असले तरी, गाडीतील मालाचे मोठे नुकसान झाले असण्याची शक्यता आहे. या गाड्या माल भरुन निघाल्या होत्या की, माल खाली करुन रिकाम्या गाड्या धावत होत्या याबाबत माहिती मिळू शकली नाही. (हेही वाचा, Odisha Train Tragedy: बालासोर रेल्वे अपघाताच्या FIR मध्ये गुन्हेगारी निष्काळजीपणाचा आरोप; CBI आजपासून करणार तपास)

व्हिडिओ

व्हिडिओ

रेल्वे अपघाताबद्दल आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, हा अपघात रविवारी पहाटे चार वाजणेच्या सुमारास घडला. दोन्ही मालगाड्या एकमेकांना समोरासमोर धडकल्याने अनेक डबे रुळावरु घसरले. अपघाताबाबत वेगवेगळी माहिती पुढे येत आहे. काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार एका मालगाडीने दुसऱ्या मालगाडीला पाठिमागून धडक दिली. ज्यामध्ये 12 डबे रुळावरुन घसरले.

व्हिडिओ

दरम्यान, बांकुरा येथील रेल्वे अपघाताने यामुळे 2 जून रोजी झालेल्या बालासोर ट्रेन दुर्घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

बालासोर रेल्वे अपघात

ओडिशा रेल्वे अपघात शुक्रवारी (2 जून) घडला. तीन गाड्यांना झालेल्या अपघातात 275 लोकांचा मृत्यू झाला आणि 1,175 हून अधिक लोक जखमी झाले. चेन्नईच्या दिशेने जाणारी शालिमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरल्याने हा भीषण अपघात झाला. शेजारच्या रुळावर असलेल्या मालगाडीला ती धडकली, त्यामुळे कोरोमंडल एक्स्प्रेसची मागची गाडी तिसऱ्या ट्रॅकवर गेली. तिसऱ्या ट्रॅकवर विरुद्ध दिशेने येणारी बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस रुळावरून घसरलेल्या डब्यांना धडकली. त्यातून ही दुर्घटना घडली.