West Bengal: नवी नोकरी मिळणार असल्याचे सांगत नवऱ्याने शेजारणीसोबत काढला पळ

येथील एका विवाहित व्यक्तीने त्याच्या शेजारी राहणाऱ्या विधवा महिलेसोबत पळ काढला आहे. व्यक्तीच्या पत्नीने पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

Extramarital Affair | (Photo Credits: File Photo)

West Bengal: प्पीडितेचे असे म्हणणे आहे की, तिने नवऱ्याचा शोध घेण्याच प्रयत्न केला, खुप फोन सुद्धा केले परंतु काहीच कळले नाही. काही वेळानंतर जेव्हा तो शेजारणीसोबत पळून गेल्याचे कळले तेव्हा खरे समोर आले.

पीडितेने आपल्या तक्रारीत पोलिसांना सांगितले की, काही वेळापूर्वी तिचा नवरा काही महत्वाची कागदपत्र एकत्रित करुन आपल्या बॅगमध्ये भरत होता. तेव्हा बायकोने त्याला याबद्दल विचारले असता त्याने एक उत्तम नोकरी मिळणार असल्याचे सांगितले. त्यामुळेच ती कागदपत्र बॅगेत ठेवत असल्याचे त्याने उत्तर दिले. परंतु दुपारी नवरा कुठेतरी निघून गेला आणि रात्र झाली तरीही तो घरी आलाच नाही. त्यामुळे नवऱ्याचा शोध घेण्यास बायकोने सुरुवात केली. पण काही कळले नाही.(लखनौ येथे स्वयंपाकगृहात रोटी तयार करण्यासाठी पीठावर थुंकत असल्याचा किळसवाणा प्रकार कॅमेऱ्यात कैद, पोलिसांकडून कारवाई)

नवऱ्याला शोधत शोधत जेव्हा ती शेजारणीच्या घरात गेली असता तिला तेथे एक नोट मिळाली. तेव्हा नोटमध्ये तिच्या नवऱ्यासोबत एक नवे आयुष्य जगण्यासाठी पळून गेल्याचे लिहिले होते. असे सांगितले जात आहे की,विधवा महिलेच्या नवऱ्याचा गेल्या दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतरच शेजारणीसोबत नवऱ्याचे संबंध अधिक वाढत गेले होते. या प्रकरणी नवऱ्याला कठोर शिक्षा द्यावी अशी बायकोने पोलिसांकडे मागणी केली आहे.