Calcutta High Court: ममता बॅनर्जी यांना कोलकाता हायकोर्टाकडून 5 लाख रुपयांचा दंड

हा दंड ठोठावताना न्यायाधिशांनी म्हटले आहे की, माझी प्रतीमा मलिन करण्याचा जाणीव पूर्वक प्रयत्न केरण्यात आला.

Mamata Banerjee | (Photo Credits: Facebook)

कोलकाता उच्च न्यायालयाचे (Kolkata High Court) न्यायाधीश कौशिक चंदा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री (West Bengal Chief Minister) ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना तब्बल 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड ठोठावताना न्यायाधिशांनी म्हटले आहे की, माझी प्रतीमा मलिन करण्याचा जाणीव पूर्वक प्रयत्न केरण्यात आला. न्यायमूर्ती कौशिक चंदा यांनी नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात सुवेंदु अधिकारी यांचा विजय घोष केला. त्यावरुन ममता बॅनर्जी यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीपासून (प्रकरण) स्वत:ला दूर केले. ममता बॅनर्जी यांनी न्यायमूर्ती कौशिक चंदा यांना हटविण्याची मागणी केली होती, कारण त्यांनी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या रुपात नियुक्त होण्यापूर्वी ते भाजपशी संबंधीत होते. न्यायमूर्ती कौशिक चंदा यांनी म्हटले आहे की, या प्रकरणाच्या सुनावणीपूर्वीच मला प्रभावित करण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात आला होता.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता हायकोर्टाला पत्र लिहून म्हटले होते की, त्यांची याचिका सुनावणीसाठी एखाद्या इतर न्यायाधीशाकडे सोपविण्यात यावी. ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम विधानसभेतून भाजप उमेदवार सुभेंदू अधिकारी यांनी केलेल्या पराभवास न्यायालयात आव्हान दिले होते. आता हे प्रकरण सुनावणीसाठी न्यायमूर्ती कौशिक चंदा यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. (हेही वाचा, West Bengal: ममता बॅनर्जी पुन्हा रिंगणात, नंदीग्राम येथील पराभवानंतर भवानीपूर येथून ‘पुनश्च हरीओम’)

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांकडून त्यांच्या वकीलाद्वारा मुख्य न्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रात ममता बॅनर्जी यांनी दोन कारणे दिली होती. यातील पहिले कारण असे होते की, जस्टीस चंदा हे पूर्वी भाजपशी संबंधीत होते. त्यामुळे या प्रकरणात पक्षपातीपणाचा धोका संभवतो असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. या याचिकेत भाजपचे शुभेंदू अधिकारी प्रतिवादी आहेत

दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम येथून भाजप नेता शुभेंदु अधिकारी यांच्या विजयावर कोलकाता उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. निवडणूक आयोगाने नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून पुन्हा मतगणना करण्याची तृणमूल काँग्रेसची मागणी फेटाळून लावली होती. आपल्या याचिकेत ममता बॅनर्जी यांनी मागणी केली की, सुभेंदू अधिकारी यांचा विजय तीन कारणांनी नाकारला जावा. एक लाचखोरी, दुसरा शत्रूभावना आणि घृणेला खतपाणी घालणे, धर्माच्या आधारे मतं मागणे, मतदान केंद्रांवर कब्जा मिळवणे अशा प्रकारचे भ्रष्ट वर्तन केल्याने हा विजय नाकारला जावा असे ममतांचे म्हणने आहे.