राष्ट्रपती भवनामध्ये लग्नगाठ बांधणारी पहिली व्यक्ती CRPF Officer Poonam Gupta कोण? घ्या जाणून
Poonam Gupta या CRPF Assistant Commandant आहेत. पूनम गुप्ताचा होणारा नवरा अविनाश कुमार हा देखील CRPF असिस्टंट कमांडंट असून तो सध्या जम्मू-काश्मीरमध्ये तैनात आहे.
दिल्लीतील राष्ट्रपती भवन (Rashtrapati Bhavan) भारताची शान आहे. देशाच्या राष्ट्रपतीचं ते शासकीय निवासस्थान आहे. सध्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू (Droupadi Murmu) तेथे वास्तव्यास आहेत. आता पहिल्यांदा या राष्ट्रपती भवनामध्ये विवाहसोहळा संपन्न होणार आहे. सीआरपीएफ ऑफिसर पूनम गुप्ता (Poonam Gupta) त्यांचे अविनाश गुप्ता (Avinash Gupta) यांच्यासोबत विवाहबद्ध होणार आहेत. अविनाश हे सीआरपीएफ असिस्टंट कमांडंट आहेत. पूनम आणि अविनाश यांचा विवाह सोहळा 12 फेब्रुवारी दिवशी संपन्न होणार आहे असे रिपोर्ट्स मधून समोर आलं आहे.
पूनम-अविनाश च्या लग्नाला परवानगी कशी?
सीआरपीएफ ऑफिसर पूनम गुप्ता सध्या राष्ट्रपती भवनामध्ये पीएसओ आहेत. त्यांनी नुकत्याच झालेल्या 74 व्या प्रजासत्ताक दिनी all-women contingentचं नेतृत्त्व केलं आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, राष्ट्रपतींनी पूनम च्या सेवेत समर्पण, व्यावसायिकता आणि कठोर कोड ऑफ कंडक्ट याकडे पाहून परवानगी दिली आहे. CRPF अधिकारी पूनम गुप्ता राष्ट्रपती भवनात लग्न करणारी पहिली व्यक्ती आहे. त्यामुळे हा विवाहसोहळा खास असणार आहे.
Poonam Gupta कोण आहे?
Poonam Gupta या CRPF Assistant Commandant आहेत. त्या मूळच्या मध्य प्रदेशच्या असून गणितामध्ये त्यांनी पदवी मिळवली आहे. इंग्रजी मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आणि पुढे बी एडचे शिक्षण घेतलेले आहे. 2018 मध्ये त्यांनी UPSC CAPF exam उत्तीर्ण केली आहे. ज्यात तिचा 81 वा क्रमांक होता. त्यांनी बिहारच्या नक्षलग्रस्त भागातही काम केले. तिची कथा धैर्य आणि चिकाटीची आहे जी देशातील अनेक तरुणींसाठी प्रेरणादायी आहे.
पूनम गुप्ताचा होणारा नवरा अविनाश कुमार हा देखील CRPF असिस्टंट कमांडंट असून तो सध्या जम्मू-काश्मीरमध्ये तैनात आहे. त्यांचा विवाह 12 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रपती भवनाच्या मदर तेरेसा क्राउन कॉम्प्लेक्समध्ये होणार असून त्यात फक्त त्यांच्या जवळच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित राहणार आहेत.
भारताच्याद्दल खास गोष्टी
राष्ट्रपती भवनाची रचना Sir Edwin Lutyens यांनी केली आहे. हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य प्रमुखाचे निवासस्थान आहे. पहिले इटलीचे Quirinal Palace आहे. 300 एकर इस्टेटवर विकसित झालेल्या राष्ट्रपती भवनात चार मजले आणि 340 खोल्या आहेत. याशिवाय प्रसिद्ध अमृत उद्यान, संग्रहालय, गणतंत्र मंडप, अशोक मंडप आणि तांब्यामुखी घुमट आहे.
1948 मध्ये, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर-जनरल, सी. राजगोपालाचारी हे राष्ट्रपती भवनात राहणारे पहिले भारतीय होते. गेल्या काही वर्षांत अनेक राष्ट्रपतींनी या भव्य निवासस्थानात वास्तव्य केले आहे आणि राष्ट्रपती भवनात अनेक उच्च-स्तरीय आंतरराष्ट्रीय राजकीय व्यक्तिमत्त्व राहिली आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)