केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयात डिजिटल मीडियाला RNI सर्टिफिकेट देण्यात यावे या मागणीचा प्रस्ताव दाखल

वेब मीडिया असोसिएशन मुंबईचे शिष्टमंडळ यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले व केंद्रीय सूचना व माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन डिजिटल मीडिया बाबत महाराष्ट्रातून मागणी केली आहे .

Union Minister for Information and Broadcasting Anurag Thakur (Photo/ANI)

डिजिटल मीडिया ऑनलाईन न्यूज पोर्टल यांना परवानगी देण्याची प्रक्रिया जलद गतीने सुरू व्हावे यासाठी देशभरातील वेब पोर्टलच्या काम करणाऱ्या पत्रकारांना RNI नोंदणी क्रमांक मिळावा यासाठी अनेक दिवसांपासून मुंबई येथील मंत्रालयातील काही वरिष्ठ पत्रकार व पत्रकारांच्या अधिकृत संघटना अनेक दिवसांपासून स्थानिक पातळीवर मागणी करत आहेत. त्याच विषयाला धरून आता जलद गतीने प्रक्रिया राबवली जावी म्हणून महाराष्ट्रातून सर्व पत्रकारांच्या मागण्या जोर धरत आहे. नुकतीच एक मागणी वेब मीडिया असोसिएशन संस्थापक अध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार अनिलभाऊ महाजन यांनी केंद्रीय सूचना व माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्याकडे मागणी केली आहे.तसेच दिल्ली येथील केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयात डिजिटल मीडियाला RNI सर्टिफिकेट देण्यात यावे या मागणीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.

वेब मीडिया असोसिएशन मुंबईचे शिष्टमंडळ यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले व केंद्रीय सूचना व माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन डिजिटल मीडिया बाबत महाराष्ट्रातून मागणी केली आहे .

वेब मीडियाच्या पत्रकारांचा कामाचा वेग , जलदगतीने वृत्तसंकलन करण्यासाठी कशा प्रकारे धावपळ केले जाते आणि शासकीय योजनांपासून वेब मीडियाचे पत्रकार कसे वंचित आहेत व वेळोवेळी शासनाकडून वेब मीडियाच्या पत्रकारांना कसा दुजाभाव केला जातो, त्यांना जाहिरात दिली जात नाही तसेच सर्व शासकीय पत्रकार परिषदा ,बैठका यासाठी शासकीय कार्यालयात परवानगीसाठी धावपळ करावी लागते काही हेकेखोर अधिकार्‍यांपासून यांना हिणवले जाते ह्या सर्व गोष्टी लक्षात आणून दिल्या .सर्वात महत्त्वाचा मोठा प्रश्‍न शासकीय जाहिरात मिळत नसल्यामुळे डिजिटल मीडियाच्या पत्रकारांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे .असे यावेळी शिष्टमंडळाने लक्षात आणून दिले.

मीडिया इंडस्ट्रीज मध्ये वेब मीडिया हे जलद गतीने वृत्त प्रसारण करण्याचे माध्यम आहे. त्यांना आपण दुर्लक्षित करू शकत नाही. शासनाच्या बातम्या व योजना जलद गतीने जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम हे वेब मीडियाच्या पत्रकारांना मार्फत केले जाते. या डिजिटल पत्रकारांसाठी न्यूज पोर्टल , युट्युब चॅनेलचे छोटे-मोठे निकष तयार करून धोरण आखावे .वेब मीडियासाठी पॉलिसी तयार करून या सर्व वेब मीडिया पोर्टल धारकांना RNI नोंदणी क्रमांक सुरू करावी प्रिंट मीडिया प्रमाणे RNI नोंदणी डिजिटल मीडिया ला देण्यात यावी अशी केली मागणी.

वेब मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष अनिल महाजन व शिष्टमंडळ तसेच मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघ अध्यक्ष श्री. मंदारदादा पारकर व त्यांची टीम,वरिष्ठ पत्रकार श्री. मिलींद लिमये ,श्री. दिलीप सपाटे,श्री.जगदाळे व मंत्रालय वार्ताहर संघाचे सर्व सदस्य यांनी डिजिटल मीडियाला नोंदणी क्रमांक द्यावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आहे व मागणी लावून धरत आहेत सर्वांच्या सहमतीने वेळोवेळी बैठका घेऊन वेब मीडियाच्या पत्रकारांच्या पाठीशी उभे राहत आहेत व महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. तसेच वेब मिडीया संघटनाचे कायदेशीर सल्लागार स्नेहल जी ढाल यांचेही मोठे सहकार्य लाभत आहे.असे यावेळी महाजन यांनी बोलतांना सांगितले