Weather Forecast for Across India: दिल्ली, केरळमध्ये मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात स्थिती काय? जाणून घ्या हवामान अंदाज

भारतीय हवामान विभाग (IMD) ने गुरुवारी (1 ऑगस्ट) दिल्ली (Delhi) आणि केरळमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) कोसळेल असा अंदाज वर्तवला आहे. त्यासोबतच राष्ट्रीय राजधानीत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्टवर असलेल्या इतर राज्यांमध्ये महाराष्ट्र, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि गोवा यांचा समावेश आहे.

Weather Forecast for Across India: दिल्ली, केरळमध्ये मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात स्थिती काय? जाणून घ्या हवामान अंदाज
Weather Forecast | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भारतीय हवामान विभाग (IMD) ने गुरुवारी (1 ऑगस्ट) दिल्ली (Delhi) आणि केरळमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) कोसळेल असा अंदाज वर्तवला आहे. त्यासोबतच राष्ट्रीय राजधानीत ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्टवर असलेल्या इतर राज्यांमध्ये महाराष्ट्र (Maharashtra), हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि गोवा यांचा समावेश आहे. देशभरातील अनेक ठिकाणी अतिपर्जन्यवृष्टी झाल्याने पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी भूस्खलन झाले आहे. वायनाड येथील भूस्खलनात शेकडो लोकांचा बळी गेला आहे. त्यामुळे हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

दिल्लीसाठी ऑरेंज अलर्ट

IMD ने दिल्लीतील रहिवाशांना निसरडे रस्ते, कमी दृश्यमानता, रहदारीतील व्यत्यय आणि मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचणे यांमुळे अपघाताची शक्यता विचारात घेऊ सतर्कतेचा इशारा दिला आहे. दिल्लीत 5 ऑगस्टपर्यंत मधूनमधून पावसाची शक्यता आहे. IMD हवामान अंदाज वर्तवताना नुकतेच म्हटले आहे की, राजधानीत वादळी वारे पाहायला मिळू शकते. राजधानीत ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे. (हेही वाचा, Uttarakhand Cloudburst: टिहरीच्या केदारनाथ आणि घणसाळीत ढगफुटी, अनेक यात्रेकरू अडकले, मोठ्या नुकसानाची भीती)

केरळचा अंदाज

IMD ने केरळमध्ये 4 ऑगस्टपर्यंत आणखी मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसाने वायनाड जिल्ह्यात 167 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. मृतांची संख्या अजूनही वाढतेच आहे. एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर, पलक्कड, मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड, कन्नूर आणि कासारगोडसह बहुतांश जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सर्व प्रदेशातील हवामानाचा अंदाज

पश्चिम आणि मध्य भारत

महाराष्ट्र: 3 ऑगस्टपर्यंत "अत्यंत मुसळधार पावसाचा" अंदाज.

मध्य प्रदेश: 1-2 ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस.

गोवा: 2-3 ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस.

गुजरात: 3 ऑगस्टला मुसळधार पाऊस.

वायव्य भारत

उत्तराखंड: 3 ऑगस्टपर्यंत "अत्यंत जोरदार पावसाचा" अंदाज.

हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश: 1 ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस.

मुसळधार पावसाची शक्यता:

जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान: 4 ऑगस्टपर्यंत.

उत्तर प्रदेश: 2-3 ऑगस्ट.

पंजाब आणि हरियाणा: 2 ऑगस्ट.

राजस्थान आणि दिल्ली: 1 ऑगस्ट.

अतिवृष्टीच्या या काळात बाधित भागातील रहिवाशांना सतर्क राहण्याचा आणि आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, वृत्त आहे की, दिल्लीतील विविध भागात मुसळधार पाऊस झाल्याने सकल भागात पाणी साचले आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. अधूनमधून हलक्या ते मध्यम पवसाच्या सरी बरसत आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Aug 01, 2024 11:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).