Mathura Water Tank Collapsed: मथुरा येथे पाण्याची टाकी कोसळली, दोन जणांचा मृत्यू,कंत्राटदारावर गुन्हा दाखल
या दुर्घटनेत 2 महिलांचा मृत्यू झाला आहे तर 13 जण जखमी झाले आहे. ही घटना रविवारी घडली आहे.
Mathura Water Tank Collapsed: उत्तर प्रदेशातील मथुरा येथे टाकी कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेत 2 महिलांचा मृत्यू झाला आहे तर 13 जण जखमी झाले आहे. ही घटना रविवारी घडली आहे. पोलिसांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. 13 जणांपैकी एकाची प्रकृिती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली. हेही वाचा- जमिनीच्या वादातून शेतकऱ्याची हत्या, चार जणांना अटक, खांडवा येथील घटना
मिळालेल्या माहितीनुसार, पाण्याची टाकी कोसळल्याने अनेक घरांचे नुकसान झाले आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे त्यामुळे विद्युत उपकरणांचे नुकसान झाले आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांचे ही नुकसान झाले आहे. ही घटना मथुरा कोतवाली पोलिस ठाण्याच्या आवास विकास कॉलनीतील कृष्ण विहार परिसरात घडली आहे. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनास्थळीचा व्हिडिओ
घटनेची माहिती मिळताच, प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहचले. पोलिस, एनडीआरएफ, एसीडीआरएफ आणि इतर आपतकालीन सेवा घटनास्थळी तैनात आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दखल घेतली आहे. या प्रकरणी कंत्राटदाराविरुध्दात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आग्रा रेजचे महानिरीक्षक दीपक कुमार यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. बचाव कार्य सुरु आहे. आरोपीवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दोन निष्पाप महिलांचा मृत्यू झाला आहे. जखमींना चांगले उपचार देण्यात येईल अशी माहिती त्यावेळीस दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,