Lok Sabha Elections 2019: ‘फिर एक बार मोदी सरकार’, जुन्यात थोडा नवा बदल करत भाजपकडून टॅगलाईनची घोषणा; प्रचार गीत लॉन्च
‘काम करणारे सरकार’, ‘प्रामाणिक सरकार’,‘मोठे निर्णय घेणारे सरकार’ अशा तिन संकल्पनांवर भाजप काम करत असल्याचे जेटली या वेळी म्हणाले. तसेच, आपले सरकार हे राष्ट्रीय सुरक्षा, महिला सशक्तीकरण, पंतप्रधान किसान योजना, काळ्या पैशाविरोधातील लढाई आणि सामाजिक योजनांवर सरकार लक्ष केंद्रित करेल. आमचा काम करण्यावर विश्वास आहे. गेल्या पाच वर्षांत आम्ही एकदाही कर वाढवला नाही. मध्यमवर्गालाही आम्ही मोठा दिलासा दिला आहे. यापुढेही दिला जाईल असेही जेटली यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक 2019 साठी भाजपने टॅगलाईन आणि गाणे प्रसिद्ध (BJP Logo And Slogan) केले आहे. 'अब की बार मोदी सरकार' या जुन्याच टॅगमध्ये थोडाफार शब्दच्छल करत 'फिर एक बार मोदी सरकार' (#PhirEkBaarModiSarkar) अशी टॅगलाईन आणि गाणे भाजपने प्रसिद्ध केले आहे. ‘फिर एक बार मोदी सरकार’ (Phir Ek Baar Modi Sarkar) हीच आपली टॅगलाईन आणि थिम सॉन्ग असल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे. गाणे आणि टॅगलाईन प्रसिद्ध करताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, पीयूष गोयल यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
‘काम करणारे सरकार’, ‘प्रामाणिक सरकार’,‘मोठे निर्णय घेणारे सरकार’ अशा तिन संकल्पनांवर भाजप काम करत असल्याचे जेटली या वेळी म्हणाले. तसेच, आपले सरकार हे राष्ट्रीय सुरक्षा, महिला सशक्तीकरण, पंतप्रधान किसान योजना, काळ्या पैशाविरोधातील लढाई आणि सामाजिक योजनांवर सरकार लक्ष केंद्रित करेल. आमचा काम करण्यावर विश्वास आहे. गेल्या पाच वर्षांत आम्ही एकदाही कर वाढवला नाही. मध्यमवर्गालाही आम्ही मोठा दिलासा दिला आहे. यापुढेही दिला जाईल असेही जेटली यांनी यावेळी आवर्जून सांगितले. (हेही वाचा, Raj Thackeray Speech At Shivaji Park: नवं मराठी वर्ष मोदीमुक्त भारताचं जावो याच गुढी पाडवा शुभेच्छा: राज ठाकरे)
काँग्रेस टॅगलाईन प्रचार गीताचे बोल
पांच साल पहले, देश ने देखा था एक सपना.
सबके साथ भी होता हो, विकास सबका अपना.
चाचा-भतीजा कोई नही, बस काबिलियत से देश चले.
फेक-वेक, फर्जी नहीं, बस सच्चाई से देश बढे.
धीरे-धीरे काम न हो, जो हो तेज फटाफट हो.
कालेधन से जंग छिडे, गरीब का बेडा पार हो…
केंद्रात मजबूत सरकार बनावे ही काँग्रेसची इच्छा नाही. गेली 72 वर्षे काँग्रेस सत्तेत आहे. परंतू, काँग्रेस काहीही करु शकली नाही. काँग्रेसला गेल्या 72 वर्षात जे जमले नाही ते आम्ही (भाजप) अवघ्या पाच वर्षांत करुन दाखवले. काँग्रेसचा जाहीरनामा हा आश्चर्यचकीत करणारा आहे. काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला. मात्र त्यात मध्यमवर्गासाठी काहीही ठोस अश्वासन नाही. त्यामुळे देशाच्या जनतेने आता ठरविण्याची वेळ आली आहे की, त्यांना मजबूत सरकार हवे की मजबूर सरकार, अशी टीकाही जेटली यांनी या वेळी केली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)