नोव्हेंबर महिन्यापासून 'या' इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमती 8-10 टक्क्यांनी वाढणार
येत्या नोव्हेंबर महिन्यापासून काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमती चक्क 8-10 टक्क्यांनी वाढणार आहे.
येत्या नोव्हेंबर महिन्यापासून काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमती चक्क 8-10 टक्क्यांनी वाढणार आहे. तर फ्रिज, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव ओव्हन आदी वस्तू महागणार आहेत. तसेच जानेवारी 2020 पासून फ्रिजच्या किंमतीतसुद्धा वाढ होणार आहे.
इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर काही कंपन्या स्टारच्या माध्यमातून ते प्रोडक्ड किती उत्तम आहे याची ओळख करुन देतात. तसेच ज्या उपकरणांवर स्टार्स असतात ते कमी उर्जा वापरतात. तर सध्या ओव्हन वरील किंमत 2 हजारापर्यंत वाढणार आहे. तर वॉशिंग मशीनवरील किंमत 1 हजार रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.(RIL AGM: Jio Giga Fiber सोबत HD TV फ्री ;Jio Phone 3 लॉन्चिंगसाठी तयार; मुकेश अंबानी यांनी दिली माहिती, जाणून घ्या अधिक)
सध्या टीव्हीच्या व्यवसायात मंदी आहे. मात्र एसी आणि फ्रिज खरेदी करण्याठी ग्राहकांची गर्दी होते. परंतु किंमती वाढवल्यामुळे अन्य परिणाम होण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज एलजी कंपनीच्या प्रमुखांनी व्यक्त केला आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर दरवाढ केल्यास ग्राहक याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.