धक्कादायक! गुरु-शिष्य नात्याला काळिमा, शिक्षकाने केला चौथीत शिकणाऱ्या 11 मुलींवर बलात्कार; POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

तेलंगणातील (Telangana) वानापार्थीमधून (Wanaparthy) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका खासगी शाळेतील शिक्षकास (School Teacher) चौथीमधील अनेक मुलींवर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे

धक्कादायक! गुरु-शिष्य नात्याला काळिमा, शिक्षकाने केला चौथीत शिकणाऱ्या 11 मुलींवर बलात्कार; POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
Representational Image | Rape | (Photo Credits: PTI)

तेलंगणातील (Telangana) वानापार्थीमधून (Wanaparthy) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका खासगी शाळेतील शिक्षकास (School Teacher) चौथीमधील अनेक मुलींवर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. शिक्षकाने तब्बल 11 मुलींवर बलात्कार केल्याचे सांगण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे यापैकी काही मुलींवर तर शाळेच्या आवारातच बलात्कार करण्यात आले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने वानपार्थी पोलिसांच्या हवाल्याने म्हटले आहे की, आरोपी शिक्षक 26 वर्षांचा आहे. यातील एका दहा वर्षांच्या मुलीच्या कुटूंबाने केलेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण उघडकीस आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या शिक्षकाने आपल्याच शाळेत शिकणाऱ्या मुलींवर लैंगिक अत्याचर केले. काही मुलींवर तर बर्‍याच वेळा लैंगिक अत्याचार केले आहेत. तसेच शिकवण्याच्या वेळीही हा शिक्षक मुलींना त्रास देत असे. याबाबत डीएसपी किरण कुमार यांनी दिलेल्या महितीनुसार, दोन मुलींपैकी एकीने तिच्या पालकांकडे रक्तस्त्राव होत असल्याची तक्रार केली, तेव्हा ही लाजीरवाणी घटना उघडकीस आली. विचारपूस केल्यावर मुलीने शिक्षकाच्या घृणास्पद प्रकाराबद्दल सांगितले. नंतर पालकांना बलात्काराचा शिकार झालेल्या दुसऱ्या मुलीबद्दल माहिती मिळाली.

(हेही वाचा: विद्यार्थ्यांना समजावे म्हणून शिक्षकांनी वर्गातच दाखवले बलात्काराचे प्रात्यक्षिक; गुन्हा दाखल)

आरोपीला पोस्को कायद्यांतर्गत कलम 376 अन्वये अटक केली गेली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी नांदेडमधील बिलोली (Biloli) तालुक्यातील 4 शिक्षकांनी, इयत्ता सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची धक्कादायक घटना घडली होती. सय्यद रसुल, दयानंद राजुरे, प्रदीप पाटील, आणि घनंजय शेळके अशी या आरोपी शिक्षकांची नावे आहेत. या प्रकरणी रामतीर्थ पोलिस ठाण्यात या चार शिक्षकांविरोधात पॉक्सो कायदा तसेच कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Mar 07, 2020 10:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).