Vodafone Idea Stock Price: व्होडाफोन आयडिया स्टॉक 8% घसरला; गोल्डमन सॅक्सचा अंदाज पाहून गुंतवणुकदारांच्या पोटात गोळा; घ्या जाणून

जागतिक ब्रोकरेज फर्म गोल्डमन सॅक्सने (Goldman Sachs) ने वर्तवलेल्या अंदाजामुळे गुंतवणुकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Vodafone Idea Stock | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Indian Telecom Sector: जागतिक ब्रोकरेज फर्म गोल्डमन सॅक्सने (Goldman Sachs) मंदीचा अहवाल जारी केल्यानंतर बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वर व्होडाफोन आयडिया कंपनीचा शेअर (Vodafone Idea Stock Price) 8 टक्क्यांनी घसरून 13.83 रुपयांच्या नीचांकी पातळीवर आला. Goldman Sachs ने कर्जबाजारी दूरसंचार कंपनीसाठी फक्त 2.5 रुपये एवढीच किंमत निर्धारित केली आहे. जी पाहून गुंतवणुकदारांच्या पोटात गोळा आल आहे. व्होडाफोन आयडिया स्टॉक सध्या पेनी स्टॉक म्हणून ओळखला जातो. अशा स्टॉकमध्ये मोठी गुंतवणूक करुन तो वाढल्यावर आणखी फायदा कमवायचा अनेकांचा विचार असतो. मृगजळापाठी धावणाऱ्या अशा गुंतवणुकदारांना गोल्डमन सॅक्सच्या अंदाजाने चांगलाच दणका दिला आहे.

स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत ताळेबंद खूपच मागे

Goldman Sachs ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, Vodafone Idea FY26E EV/EBITDA च्या 24 पटीने व्यापार करत आहे. जे तिच्या स्पर्धक कंपन्या भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओपेक्षा जवळपास 100% जास्त आहे. कमकुवत वाढ, कमी मार्जिन परतावा आणि प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत ताणलेला ताळेबंद पाहता, हा प्रीमियम टिकून राहिली अशी फारश आशा आम्हाला दिसत नाही. त्यामुळे या स्टॉकची 12-महिन्याच्या DCF-आधारित सुधारीत लक्ष्य किंमत आम्ही केवळ 2.5 रुपयांसह 'सेल' रेटिंग कायम ठेवतो, जे सध्याच्या पातळींपेक्षा 83% घट दर्शवते. (हेही वाचा, Jio, Airtel आणि Vi चे अनलिमिडेट डेटासह कॉलिंगचे प्लॅनची किंमत 200 रुपयांहून कमी, जाणून घ्या अधिक)

वोडाफोन आयडीयासाठी पुढचे काही वर्षेही संघर्ष कायम

गोल्डमन सॅक्स भाकीत करते की, Vodafone Idea चे 20,100 कोटी रुपयांचे भांडवल असूनही कंपनी नफा कमविण्यासाठी या पुढेही संघर्षच करत राहील. कंपनीच्या भांडवलात फॉलो-ऑन पब्लिक ऑफर आणि प्रवर्तक निधीचाही समावेश आहे. ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे की, Vodafone Idea ची अलीकडील भांडवल वाढ, वाढत्या प्रमाणात सकारात्मक असली तरी, कंपनीच्या मार्केट शेअरची घसरण थांबवण्यासाठी पुरेशी असण्याची शक्यता नाही. गोल्डमनने पुढील 3-4 वर्षांमध्ये कंपनीसाठी आणखी 300 bps शेअर तोटा होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

आयडिया व्होडाफोनची कामगिरी सुमार

गोल्डमन सॅक्सचे मनीष अडुकिया यांनी आयडीया वोडाफोन बाबत बोलताना सांगितले की, अहवालात व्होडाफोन आयडियाची आगामी आर्थिक वर्षापासून सुरू होणारी AGR आणि स्पेक्ट्रम देयके संबंधित पेमेंट्सवर प्रकाश टाकण्यात आला आहे. "सरकारकडे यापैकी काही देय रक्कम इक्विटीमध्ये रूपांतरित करण्याचा पर्याय असला तरी, आमचा अंदाज आहे की, व्होडाफोनसाठी प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (ARPU) 200-270 रुपयांनी वाढेल (डिसेंबर 2024 पातळीपासून 120%-150% वाढ) फ्री कॅश फ्लो न्यूट्रॅलिटी प्राप्त करण्याची कल्पना, जी मध्यम कालावधीत कमी संभाव्यता घटना आहे असे आम्हाला वाटते.

दरम्यान, Vodafone Idea, 17% महसूल बाजार वाटा असलेली भारतातील तिसरी-सर्वात मोठी दूरसंचार ऑपरेटर कंपनी आहे. ही कंपनी गेल्या तीन वर्षात महसुलातील वाटा सुमारे 500 बेस पॉइंट्स गमावून आपले प्रतिस्पर्धी Bharti Airtel आणि Reliance Jio यांच्यापेक्षा सातत्याने महसूली तूट अनुभवत आहे. कंपनीची कामगिरी नकारात्मकच सुरु आहे. गोल्डमन सॅक्सने इशारा देताना म्हटले आहे की, स्पर्धकांच्या तुलनेत भांडवली खर्च कमी झाल्यामुळे कंपनीची आवस्था आणखीच बिघडू शकते.