Shahid Jameel या विषाणूतज्ञाने केंद्र सरकारच्या COVID-19 Genome Surveillance Project ला ठोकला रामराम; देशातील कोरोनास्थिती हाताळण्यावरून केली होती टीका

सध्या शाहीद जमील हे अशोक विद्यापीठातील 'त्रिवेदी स्कूल ऑफ बायोसायन्स'चे संचालक आहेत.

Coronavirus | | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

भारतामध्ये कोविड 19 च्या संसर्गानंतर परिस्थिस्ती नियंत्रणात ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या scientific advisory group of Indian SARS-CoV-2 Genome Sequencing Consortia (INSACOG)च्या चेअरमन पदी असलेल्या शाहीद जमील (Shahid Jameel) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ही समिती मागील वर्षी डिसेंबर बनवण्यात आली होती. सध्या शाहीद जमील हे अशोक विद्यापीठातील 'त्रिवेदी स्कूल ऑफ बायोसायन्स'चे संचालक आहेत.

INSACOG मध्ये देशातील 10 लॅब्स एकत्र काम करतात. याच्या माध्यमातून भारतात कोविड 19 साठी कारणीभूत असलेला SARS-CoV-2 मध्ये कसे आणि कोणते बदल होतात हे पाहण्यासाठी काम केले जाते.

ANI Tweet

भारतामध्ये युके, ब्राझील आणि साऊथ आफ्रिका या तीन देशांमध्ये आढळलेल्या म्युटंट कोरोना वायरसचे नमुने आढळले आहेत. जगात सध्या 6 विविध कोरोना वायरसच्या प्रकरांमुळे दहशत पसरलेली आहे. देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट देखील याच म्युटंट वायरसमुळे धुमाकूळ घालत आहे.

भारतामध्ये महाराष्ट्रात कोरोना वायरसमुळे स्थिती चिंताजनक बनलेली आहे. महाराष्ट्रात डबल म्युटंट आढळल्यानेही संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचं समोर आलं आहे. हा डबल म्युटंट B.1.617 आहे. हा पहिल्यांदा महाराष्ट्रात आढळला आणि नंतर तो इतर राज्यांत पसरल्याचा दावा देखील केला जातो.

डॉ. शाहीद जमील यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 हजार वायरस सिक्वेंस पैकी 11% वायरस हे variants of concern आहेत. त्यापैकी हा B.1.1.7 हा युके वायरंट चिंताजनक आहे आणि तो भारतात पश्चिम बंगाल मध्ये आढळलेल्या B.1.351 सोबत धुमाकूळ घालत आहे.

भारताप्रमाणे जगात ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड, जर्मनी, सिंगापूर, युके, अमेरिका येथेही डबल म्युटंट आढळला आहे.