Viral Video: तरुण, महिला, मुला-मुलींमध्ये रिलची क्रेझ वाढत आहे. त्यामुळे या लोकांचा जीवही धोक्यात आला आहे. गाझियाबादच्या इंदिरापुरममध्ये आता एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिथे एक मुलगी रील बनवताना सहाव्या मजल्यावरून खाली पडली. मुलीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गाझियाबादच्या इंदिरापुरम येथील क्लाउड सोसायटीमध्ये ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पाऊस पडत होता आणि या इमारतीत राहणारी मोनिषा ही 16 वर्षांची मुलगी तिच्या फ्लॅटच्या बाल्कनीत उभी राहून रील बनवत होती. रील बनवत असताना तिच्या हातातून मोबाईल निसटला आणि मोबाईल पकडण्याच्या प्रयत्नात ती बाल्कनीतून खाली पडली. या घटनेनंतर मुलगी खाली पडली असून ती गंभीर जखमी झाल्याचे दिसून येते. मुलगी खाली पडताच इमारतीत एकच गोंधळ उडाला. हे देखील वाचा: Stunt Viral Video: चालत्या ट्रकच्या मागे जीव डोक्यात घालून स्केटिंग करत होते दोन तरुण, व्हिडीओ व्हायरल
व्हिडिओ पाहा:
गाजियाबाद में रील बनाने के चक्कर में एक लड़की छठे फ्लोर से नीचे गिर गई
लड़की अपने बालकनी में मोबाइल से रील बना रही थी
उसे गंभीर हालत में हॉस्पिटल में भर्ती कराया गया है
उसकी हालत नाजुक बताई जा रही है
Ghaziabad Reel Girl #Ghaziabad #Reels #Girl pic.twitter.com/axKfgh45V4
— Aman Yadav (News24) (@Amanyadav7629) August 14, 2024
जखमी अवस्थेतही मुलगी रुग्णवाहिका बोलवण्याबाबत बोलत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. आजूबाजूला बरेच लोक आहेत, पण लगेच कोणी उचलत नाही, मग दोन लोक येऊन मुलीला उचलतात. घटनेनंतर मुलीचे कुटुंबीयही खाली येतात. आणि तिला रुग्णालयात घेऊन जाण्यात येते. मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. @Amanyadav7629 या हँडलवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आह