Vikas Gowda: विमानतळावर व्लॉगिंग करणे पडले महागात, 23 वर्षीय युट्यूबरला अटक
विकास गौडाचे युट्युबवर 1 लाखाहून अधिक स्बस्क्राइबर्स आहेत. बंगळुरू एअरपोर्ट टर्मिनल 2 वरील सुरक्षाव्यवस्थेला चुकवून त्याने हा व्हिडीओ बनवला. त्याचा हा व्हिडीओ त्यांने पोस्ट केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून त्यानंतर हा व्हिडिओ युट्यूबवरुन हटवण्यात आला.

बंगळुरूमध्ये (Bengaluru). एका व्लॉगरने चक्क चांगले व्ह्यूव्ज मिळवण्यासाठी एअरपोर्टवर लपून शूटिंग केली. विकास गोवडा (Vikas Gowda) नावाच्या 23 वर्षीय युट्यूबरनं विमानतळावर जास्त वेळ घालवल्याचं चॅलेंज त्याच्या व्लॉगमध्ये केलं. आता या युट्यूबरला अटक करण्यात आली आहे. इंडियन एक्स्प्रेसने या संदर्भातील वृत्त दिले आहे. विकास हा युट्युबसाठी व्हिडीओज बनवतो. त्याने एअर इंडियाचं बंगळुरू ते चेन्नईला जाणार तिकीट खरेदी केलं. पण हे तिकीट त्याने प्रवास करण्यासाठी नव्हे तर एअरपोर्टवर व्लॉग बनवण्यासाठी त्यांने हे तिकीट खरेदी केले होते. (हेही वाचा - YouTuber Abhradeep Saha Dies: युट्युबर अभ्रदीप साहा याचे अवघ्या 27 व्या वर्षी निधन, वैद्यकीय उपचारादरम्यान मृत्यू)
पाहा पोस्ट -
विकास गौडाचे युट्युबवर 1 लाखाहून अधिक स्बस्क्राइबर्स आहेत. बंगळुरू एअरपोर्ट टर्मिनल 2 वरील सुरक्षाव्यवस्थेला चुकवून त्याने हा व्हिडीओ बनवला. त्याचा हा व्हिडीओ त्यांने पोस्ट केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून त्यानंतर हा व्हिडिओ युट्यूबवरुन हटवण्यात आला. विकासवर आयपीसी अंतर्गत दोन कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच एअरपोर्टवर परवानगीविना व्हिडीओ शूट केल्याबद्दलही गुन्हा नोंदवण्यात आला आहे . एअरपोर्टसारख्या संवेदनशील परिसरात अशाप्रकारे कृत्य केल्याबद्दल त्याच्यावर थेट कायदेशीर कारवाई करण्यात आली.
विकासने 7 एप्रिलला दुपारी 12 वाजून 6 मिनिटांनी एअरपोर्टवर प्रवेश केला आणि व्हिडीओज रेकॉर्ड करायला सुरुवात केली. तो पकडला जाणार नाही अशी बढाई त्याने व्हिडिओमध्ये मारली आणि त्याने एअरपोर्टवर असलेल्या सुरक्षायंत्रणांवर टीका देखील केली. त्यांने विमानतळावर चार ते पाच तास एअरपोर्टवर घालवले होते आणि हे फक्त त्याने त्याच्या युट्युब चॅनेलवर जास्त व्ह्यूव्ज येण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी त्याने केलं होतं. विकासवर भारतीय दंड संहितेच्या कलम 505 (सार्वजनिक गैरव्यवहारास कारणीभूत विधाने) आणि 448 (घरगुती अतिक्रमण) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला जामीन मिळाला असला तरीही पुढील चौकशीसाठी त्याला पुन्हा हजर राहण्यास सांगितले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)