Jagdeep Dhankhar Resignation: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जगदीप धनखड यांना शुभेच्छा

उपराष्ट्रपती तथा उपाध्यक्ष जगदीप धनखर यांनी आरोग्याच्या चिंतेचे कारण देत पदाचा राजीनामा दिला, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. धनखर यांचा राजीनामा पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेत जाहीर करण्यात आला.

Governor Jagdeep Dhankhar AND PM Narendra Modi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Monsoon Session 2025: भारताचे उपराष्ट्रपती (Vice President of India) जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar Resignation) यांनी 21 जुलै 2025 रोजी आरोग्याच्या चिंता आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्याची गरज असल्याचे कारण देत आपल्या पदाचा राजीनामा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनखड यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि देशासाठी केलेल्या त्यांच्या सेवेचे कौतुक केले. जगदीप धनखड जी यांना भारताचे उपराष्ट्रपती म्हणून विविध पदांवर आपल्या देशाची सेवा करण्याच्या अनेक संधी मिळाल्या आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा, असे पंतप्रधानांनी आपल्या एक्स पोस्टवर म्हटले आहे.

राज्यसभेतमध्ये औपचारिक घोषणा

उपसभापती यांनी मंगळारी उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्याची औपचारीक घोषणा करण्यात आली. विरोधकांच्या घोषणाबाजी दरम्यान सभागृह 2 PM पर्यंत तहकूब करण्यापूर्वी ही घोषणा करण्यात आली. सभागृहास सांगण्यात आले की Ministry of Home Affairs च्या अधिसूचनेद्वारे उपराष्ट्रपतींचा राजीनामा Article 67A अंतर्गत तत्काळ प्रभावाने स्वीकृत झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

धनखड यांचे राजीनामा पत्र

राज्यसभेचे अध्यक्ष म्हणूनही काम केलेले धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राजीनामा सोमवारी, सादर केला. आरोग्य सेवेला प्राधान्य देण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्यासाठी, मी संविधानाच्या कलम 67(अ) नुसार तात्काळ प्रभावीपणे भारताच्या उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा देत आहे, असे त्यांनी त्यांच्या पत्रात लिहिले आहे. त्यांनी राष्ट्रपतींचे आभार व्यक्त करताना म्हटले आहे की, "माझ्या कार्यकाळात आपण राखलेल्या अढळ पाठिंब्याबद्दल आणि शांत आणि अद्भुत कार्य संबंधांबद्दल मी महामहिम - भारताच्या माननीय राष्ट्रपतींचे मनापासून आभार मानतो."

पंतप्रधान मोदी आणि खासदारांबद्दल कृतज्ञता

उपराष्ट्रपतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाचे आभार मानत म्हटले आहे की, पंतप्रधानांचे सहकार्य आणि पाठिंबा अमूल्य आहे आणि माझ्या कार्यकाळात मी बरेच काही शिकलो आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, सर्व संसद सदस्यांकडून मला मिळालेली उबदारपणा, विश्वास आणि प्रेम नेहमीच जपले जाईल आणि माझ्या स्मरणात राहील.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनखर यांचा राजीनामा आला आहे. त्यांनी 11 ऑगस्ट २०२२ रोजी भारताचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती आणि त्यांच्या कार्यकाळात त्यांनी राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement