तब्बल 13 वर्षांनंतर; बहुचर्चित सोहराबुद्दीन शेख एन्काउंटर प्रकरणाचा आज निकाल
या प्रकरणाची सुनावणी गुजरात येथील न्यायालयात सुरु होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशनंतर हे प्रकरण 2012 मध्ये मुंबईला हालविण्यात आले. हे प्रकरण मुंबईकडे येण्यापूर्वी न्यायमूर्ती बृजगोपाल गोया या प्रकरणावर सुनावणी घेत होते. मात्र, दरम्यानच्या काळात त्यांचे निधन झाले.
बहुचर्चित सोहराबुद्दीन शेख एन्काउंटर (Sohrabuddin Sheikh Fake Encounter) प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग (Central Bureau of Investigation) विशेष न्यायालय आज (21 डिसेंबर) निर्णय देणार आहे. 2005/6च्या दरम्यान, झालेल्या या एन्काउंटर प्रकरणात गँगस्टर सोहराबुद्दीन आणि तुलसीराम प्रजापती यांचा चकमकीत मृत्यू झाला होता. त्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. तब्बल 13 वर्षांनतर न्यायालय या प्रकरणात आपला निर्णय देणार आहे. या प्रकरणाची अंतिम सुनावणी 5 डिसेंबरला संपली होती. सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस. जे. शर्मा या प्रकरणावर निर्णय देणार आहेत.
अमित शाह आरोपमुक्त!
या प्रकरणात एकूण 37 जणांना आरोपी बनविण्यात आले होते. त्यापैकी 16 जणांना 2014मध्ये आरोपमुक्त करण्यात आले होते. आरोपांमधून मुक्तता करण्यात आलेल्या व्यक्तिंमध्ये भारतीय जनता पक्षाचे विद्यमान अध्यक्ष अमित शाह (तत्कालीन गृहमंत्री), पोलीस ऑफिसर डी. डी. बंजारा यांच्यासारख्या अनेक बड्या मंडळींची नावे होती. या प्रकरणाची सुनावनी गुजरातमध्ये सुरु होती. मात्र, काही काळानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबईकडे हस्तांतरणीत करण्यात आले. दरम्यान, बचावपक्षाचा आरोप आहे की, सोहराबुद्दीन शेख हा दहशतवादी संघटनेशी संबंध होता. तो एका मोठ्या कटासाठी काम करत होता. (हेही वाचा, Bulandshahr Violence: बजरंग दल, विहिंप, भाजयुमो कार्यकर्त्यांसह 87 जणांवर FIR)
काय आहे प्रकरण?
सोहराबुद्दीन शेख याचा एन्काउंटर 2015मध्ये झाला. या प्रकरणाची सुनावणी गुजरात येथील न्यायालयात सुरु होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशनंतर हे प्रकरण 2012 मध्ये मुंबईला हालविण्यात आले. हे प्रकरण मुंबईकडे येण्यापूर्वी न्यायमूर्ती बृजगोपाल गोया या प्रकरणावर सुनावणी घेत होते. मात्र, दरम्यानच्या काळात त्यांचे निधन झाले. त्यानंतर या प्रकरणाची करण्यावर प्रसारमाध्यमांवर बंदी घालण्यात आली होती.