Gyanvapi Mosque Case: ज्ञानवापी मशिदीप्रकरणी आज महत्वपूर्ण सुनावणी, होणार शिवलिंग बाबत फैसला

शिंवलिंग प्रकरणी मुस्लीम आणि हिंदू पक्षांची बाजू ऐकल्यावर वाराणसी जिल्हा न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

ज्ञानवापी मशिदीच्या (Gyanvapi Mosque) आवारात सापडलेल्या "शिवलिंग" च्या कार्बन डेटिंगच्या (Carbon Dating) याचिकेवर आज महत्वपूर्ण सुणावणी होणार आहे. वाराणसी जिल्हा न्यायालय शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगबाबत आज आपला निकाल देणार आहे. हिंदू याचिकाकर्त्यांनी मशीद परिसराच्या न्यायालयीन अनिवार्य व्हिडिओग्राफी (Video Graphy) सर्वेक्षणादरम्यान असा दावा केला होता की मुस्लिम भाविकांनी नमाज अदा करण्यापूर्वी धार्मिक विधी करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या "वजूखाना" च्या जवळ एक "शिवलिंग" (shiv ling) सापडले आहे. पण हे शिवलिंग नसून हा "फव्वारा" असल्याचं मुस्लीम धर्मियांकडून सांगण्यात आलं होतं. तरी गेल्या मंगळवारी या याचिकेवरील युक्तिवाद पूर्ण झाला असून न्यायालय शुक्रवारी निकाल देणार असल्याचे जिल्हा सरकारी वकील महेंद्र प्रताप पांडे (Mahendra Pande) यांनी सांगितले होते. म्हणजेच आज या घटल्याचा महत्वपूर्ण निर्णय वाराणसी जिल्हा न्यायालय देणार आहे.

 

मुस्लीम पक्षातर्फे  बाजू मांडणारे वकील मुमताज अहमद (Mumtaz Ahmed) म्हणाले की, त्यांनी कोर्टाला सांगितले की वस्तूची कार्बन डेटिंग (Carbon Dating) करता येणार नाही. कार्बन डेटिंगच्या नावाखाली वस्तूचे नुकसान होत असेल तर ते सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशाचा अवमान करण्यासारखे आहे, असे मुमताज अहमद (Mumtaz Ahmed) म्हणाले. तरी शिंवलिंग प्रकरणी मुस्लीम आणि हिंदू पक्षांची बाजू ऐकल्यावर वाराणसी जिल्हा न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. (हे ही वाचा:- Election Commission: गुजरातसह हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहिर होणार, भारत निवडणूक आयोगाची महत्वाची पत्रकार परिषद)

 

याचिकेच्या सुरुवातीस मुस्लिम बाजूने असा युक्तिवाद केला होता की सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना वस्तू सुरक्षित ठेवण्यास सांगितले होते.अशा परिस्थितीत त्याची तपासणी करणे समर्थनीय ठरू शकत नाही, असे ते म्हणाले होते.मुस्लिम बाजूने असेही म्हटले आहे की मूळ प्रकरण शृंगार गौरीच्या पूजेचे आहे तर मशिदीतील संरचनेचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.अशा स्थितीत पुरातत्व विभागाकडून कोणतीही तपासणी केली जाऊ शकत नाही किंवा शास्त्रोक्त तपासणी करून कायदेशीर अहवाल मागवता येणार नाही, असे ते म्हणाले होते. पण हिंदू पक्षाची बाजू ऐकता शिंवलिंगास अधिक महत्व आहे अशी बाजू मांडण्यात आली होती. तरी आज वाराणासी जिल्हा न्यायालयाकडून (Varanasi Court) देण्यात येणारा निर्णय या खटल्या संदर्भात अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif