Vande Bharat Express Train Accident: वंदे भारत ट्रेनची धडक बसल्याने एक जण जागीच ठार

भारतातील सर्वात वेगवाण ट्रेन अशी ओळख असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन (Vande Bharat Express Train) धडकल्याने एक जण जागीच ठार झाला. ही घटना उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील फिरोजाबाद जिल्ह्यात ट्रेन वाराणसीहून दिल्लीला जात असताना तुंडलाजवळील (Tundla) जलेसर आणि पोरा शहरांदरम्यान घडली.

Vande Bharat Train | (File Image)

भारतातील सर्वात वेगवाण ट्रेन अशी ओळख असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन (Vande Bharat Express Train) धडकल्याने एक जण जागीच ठार झाला. ही घटना उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील फिरोजाबाद जिल्ह्यात ट्रेन वाराणसीहून दिल्लीला जात असताना तुंडलाजवळील (Tundla) जलेसर आणि पोरा शहरांदरम्यान घडली. प्राप्त माहितीनुसार जेसलमेर आणि पारा स्टेशन नजीक एक युवक रेल्वे रुळ ओलांडत होता. दरम्यान, वेगवान ट्रेनची त्याला जोरदार धडक बसली. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनसोबत अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. अनेक वेळा रेल्वे रुळावर म्हैशी अथवा इतर काही जनावरे आल्यानेही अपघात घडले आहेत. ज्यामुळे ट्रेनच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वंदे भारत ट्रेनसाठी विशेष आग्रही आहेत. मंगळवारी (27 जून) त्यांनी आणखी एका वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. या वेळी त्यांनी भोपाळ येथील राणी कमलापती रेल्वे स्टेशन येथून 5 वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. या वेळी त्यांनी विद्यार्थी आणि काही कर्मचाऱ्यांशीही चर्चा केली. मोदी यांनी ज्या पाच ट्रेन्सना हिरवा झेंडा दाखवला त्यात रानी कमलापती-जबलपुर वंदे भारत ट्रेन, खजुराहो-भोपाल-इंदौर वंदे भारत एक्सप्रेस, मडगांव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस, धारवाड़-बेंगलुरु वंदे भारत एक्सप्रेस आणि ट्रेन रांची-पटना वंदे भारत एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे. (हेही वाचा, Mumbai-Madgaon Vande Bharat Express: मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस 28 जूनपासून सुरू होणार; जाणून घ्या वेळा, थांबे आणि प्रवासाचा कालावधी)

वंदे भारत एक्सप्रेस म्हणजे काय?

वंदे भारत एक्सप्रेस हा अर्ध-हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प आहे. ट्रेन 18 म्हणूनही ओळखल्या जाणार्‍या, या ट्रेन्सचे व्यवस्थापन आणि देखभाल भारतीय रेल्वेकडून केली जाते. वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांमध्ये उत्कृष्ट तंत्रज्ञानाचा समावेश आहे, जी एक ट्रेन कोलिजन अवॉयडन्स सिस्टम (TCAS) आहे.

सुविधांच्या बाबतीत, या ट्रेन्स विमान, इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि ऑटोमेटेड दरवाजे यांसारख्या रिक्लाईनिंग सीट्सने सुसज्ज आहेत. त्या जास्तीत जास्त 180 किमी प्रति तास वेगाने प्रवास करू शकतात. या ट्रेन सध्या ताशी 160 किमी वेगाने धावत आहेत. तसेच ट्रेनच्या प्रत्येक डब्यात फायर डिटेक्शन आणि कम्युनिकेशन यंत्रणा बसवण्यात आली आहे.

केंद्र सरकारने ऑगस्ट 2023 मध्ये भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनापर्यंत 75 वंदे भारत एक्सप्रेस गाड्या कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now