Uttarakhand Shocker: रामनगरमध्ये अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या मुलीने ठेवले अनेक लोकांशी शारीरिक संबंध; 20 जणांना झाली HIV ची लागण

या मुलीने अनेक लोकांशी शारीरिक संबंध ठेवले होते. कालांतराने या मुलीच्या संपर्कात आलेल्या नशेबाजांची प्रकृती कमकुवत व्हायला लागली.

Photo Credit: Pixabay

उत्तराखंडमधील (Uttarakhand) नैनिताल जिल्ह्यातील रामनगरमध्ये (Ramnagar) अंमली पदार्थांचा व्यापार वाढत आहे. याठिकाणी अनेक तस्कर पकडले गेले आहेत, मात्र असे असतानाही त्यांना रोखणे कठीण होत आहे. आता रामनगरमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या किशोरवयीन मुलीच्या संपर्कात आल्यानंतर 20 हून अधिक लोक एचआयव्ही पॉझिटिव्ह झाले आहेत. ड्रग्जच्या अंमलाखाली या मुलीने लोकांना फसवले आणि त्यांच्याशी अवैध संबंध ठेवले. त्यांनतर अनेकांना एचआयव्हीची लागण झाली. आता हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांची चौकशी केली जात आहे.

परिसरात एचआयव्ही बाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, लोकांना संसर्ग झाल्याच्या बातम्या अचानक समोर आल्या आहेत. एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळलेल्या अनेक व्यसनी विवाहित आहेत. या घटनेनंतर संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण आहे. आरोग्य विभाग आणि पोलिस प्रशासनानेही तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामनगर येथे राहणारी एक अल्पवयीन मुलगी अंमली पदार्थांचे सेवन करते आणि शहरातील कोणत्याही गल्लीबोळात खुलेआम फिरताना दिसते. या मुलीने अनेक लोकांशी शारीरिक संबंध ठेवले होते. कालांतराने या मुलीच्या संपर्कात आलेल्या नशेबाजांची प्रकृती कमकुवत व्हायला लागली आणि इतर तक्रारी समोर आल्या. त्यांनी तपासणी केली असता ते एचआयव्ही बाधित असल्याची पुष्टी झाली. सर्व एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांचे समुपदेशन केले असता केवळ एका मुलीचे नाव पुढे आले. (हेही वाचा: UP Horror: शेळीवर बलात्कार करून तिची हत्या केली; Mainpuri मधील धक्कादायक घटना, आरोपीला अटक)

या प्रकरणाची माहिती देताना जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.हरीश पंत म्हणाले की, गेल्या तीन ते चार वर्षात रामनगरमध्ये दरवर्षी सुमारे 20 एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत होते. यावर्षी एप्रिलपासून सहा महिन्यांत 19 जण एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. ज्या लोकांची एचआयव्ही पॉझिटिव्ह चाचणी झाली आहे ते सर्व तरुण वयाचे आहेत.