Chardham Yatra: उत्तराखंड सरकारकडून इतर राज्यातील लोकांना चारधाम यात्रेस परवानगी; ‘या’ नियमांचे पालन करणे बंधनकारक

मात्र आता इतर राज्यातील यात्रेकरूंना चारधाम यात्रेला अटी व शर्तींसह परवानगी देण्यात आली आहे. सरकारने यासाठी नवीन एसओपी जारी केले आहे.

Kedarnath Temple (Photo Credits: Wikimedia Commons)

उत्तराखंडची (Uttarakhand) प्रसिद्ध चारधाम यात्रा (Chardham Yatra) अनलॉक नंतर केवळ राज्यातील लोकांसाठीच सुरु केली होती. मात्र आता इतर राज्यातील यात्रेकरूंना चारधाम यात्रेला अटी व शर्तींसह परवानगी देण्यात आली आहे. सरकारने यासाठी नवीन एसओपी जारी केले आहे. चारधाम देवस्थानम बोर्डाच्या (Uttarakhand Chardham Devasthanam Board) संकेतस्थळावर अर्जानंतर यासाठी पास दिले जातील. त्यासाठी प्रवाशांना 72 तासात केलेल्या कोरोना विषाणू (Coronavirus) तपासणीचा अहवाल द्यावा लागेल. हा रिपोर्ट नसल्यास प्रवाशांना क्वारंटाईन व्हावे लागेल. यासह, क्वारंटाईन सेंटरमधून कालावधी पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्रही द्यावे लागेल. यासोबतच आयडी प्रूफ देखील दाखवणे गरजेचे आहे.

राज्यात प्रवेशानंतर मूळ ओळखपत्र बाळगणे बंधनकारक असेल. त्याशिवाय वेबसाइटवर अपलोड केलेल्या कागदपत्रांची मूळ प्रतही स्वतःजवळ ठेवणे बंधनकारक असेल. तीर्थक्षेत्र व पर्यटन व्यवसाय अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला आहे.

एएनआय ट्वीट-

त्याचवेळी, सीएम त्रिवेंद्रसिंह रावत म्हणाले की, जर बाहेरील राज्यांतील कोविडवर मात केलेल्या व्यक्तीस उत्तराखंडला यायचे असेल तर, त्याच्यावर कोणतेही बंधन घालण्यात येणार नाही. यामुळे राज्यातील पर्यटन कार्यास चालना मिळेल आणि कोरोनाचे युद्ध जिंकून आलेले निरोगी लोक उत्तराखंडच्या वातावरणाचा आनंद घेऊ शकतील.

धार्मिक स्थळे सुरु करण्याची परवानगी मिळाल्यानंतर राज्य सरकारने चारधाम यात्रेचा निर्णय, उत्तराखंड चारधाम देवस्थानम बोर्डाकडे सोपविला होता. यात उत्तराखंडच्या भाविकांना चारधामला भेटी देण्यास परवानगी देण्यात आली. पहिल्या टप्प्यात मंडळाने चमोली, रुद्रप्रयाग आणि उत्तरकाशी जिल्ह्यातील रहिवाशांना आपापल्या धामांमध्ये जाण्याची परवानगी दिली. 1 जुलैपासून रहिवाशांना चारधामच्या बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री येथे नोंदणी करून कण्यास परवानगी देण्यात आली. यामध्ये कोविड-19 च्या सुरक्षा नियमांचे पालन करणे बंधनकार होते. (हेही वाचा: कोरोना व्हायरस महामारीमध्ये केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लाँच केला 'भाभी जी पापड')

आता इतर राज्यातील प्रवाशांनाही चारधाम यात्रा करण्याची परवानगी दिली गेली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काही अटींसह प्रवासास परवानगी देण्यात आली आहे.