Uttarakhand Flood: नक्की का घडली उत्तराखंड दुर्घटना? कोण जबाबदार? जाणून घ्या काय म्हणतात Environment Experts
उपग्रह आणि गुगल अर्थ प्रतिमांमध्ये या प्रदेशाजवळील हिमवृष्टी दिसत नाही, परंतु त्या प्रदेशात पाण्याचे अनेक साठे असण्याची शक्यता आहे. हिमनगांमध्ये पाण्याच्या तलाव असू शकतात, यामुळेच ही घटना घडली असावी.
उत्तराखंडच्या (Uttarakhand) चमोली जिल्ह्यात रविवारी हिमकडा (Glacier) कोसळल्यामुळे आतापर्यंत 150 लोक बेपत्ता आहेत आणि 10 जणांचे मृतदेह सापडले आहेत. हिमनग कोसळल्याने परिसरात प्रचंड नाश झाला आहे. राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये अशा अनेक नैसर्गिक आपत्ती ओढवल्या आहे. आता प्रश्न उभा राहिला आहे की, हे नक्की का घडत आहे? याला जबादार कोण? याबाबत अनेक तज्ज्ञांनी आपले मत व्यक्त केले आहे. पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील हिमालयी प्रदेशात वाढणारा मानवी हस्तक्षेप (Human Intervention) हवामान बदलांस अधिक असुरक्षित बनवित आहे. कदाचित म्हणूनच उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील जोशीमठ येथे हिमनग फुटल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात पूर आला, असे पर्यावरण तज्ज्ञांनी (Environment Experts) रविवारी सांगितले.
‘या घटनेचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही आणि मात्र इथे प्रामाणिकपणे तपासणीची गरज आहे. परंतु पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील हिमालयी प्रदेशात वाढत चाललेला मानवी हस्तक्षेप हा हवामान बदलाला अधिक असुरक्षित बनवित आहे. त्यामुळे संवेदनशील इको-सेन्सिटिव्ह झोनमधील जड बांधकामांचे काम टाळले पाहिजे’, असे ग्रीनपीस इंडियाचे ज्येष्ठ हवामान व ऊर्जा अभियंता अविनाश चंचल यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ‘हिमालयीन प्रदेशात सर्वात कमी देखरेख केली जात आहे. या जागेचा मागोवा घेण्यासाठी सरकारने अधिकाधिक संसाधने खर्च करण्याची गरज आहे, जेणेकरून अधिक जागरूकता निर्माण होईल.’
‘हिमवानगाचा स्फोट होणे ही एक दुर्मीळ घटना आहे. उपग्रह आणि गुगल अर्थ प्रतिमांमध्ये या प्रदेशाजवळील हिमवृष्टी दिसत नाही, परंतु त्या प्रदेशात पाण्याचे अनेक साठे असण्याची शक्यता आहे. हिमनगांमध्ये पाण्याच्या तलाव असू शकतात, यामुळेच ही घटना घडली असावी. ही खरोखरच यामुळेच घडलेली घटना होती का याची पुष्टी करण्यासाठी आम्हाला पुढील विश्लेषण, हवामान अहवाल आणि डेटा आवश्यक आहेत,' असे प्रकाश, संशोधन संचालक आणि हैदराबादच्या इंडियन स्कूल ऑफ बिझिनेस (आयएसबी) येथे अॅडजुंक्ट असोसिएट प्रोफेसर यांनी सांगितले.
आझम म्हणाले की, ‘बर्फाची थर्मल प्रोफाईल वाढत आहे, कारण पूर्वीचे बर्फाचे तापमान -6 ते -20 डिग्री सेल्सिअस पर्यंत होते, ते आता -2 डिग्री आहे. ज्यामुळे ते लवकर वितळत आहे. वाढीव बर्फवृष्टी आणि पाऊस, हिवाळ्यामधील वाढलेले तापमान आणि हवामानातील बदल यामुळे बर्याच प्रमाणात बर्फ वितळत आहे.’ (हेही वाचा: निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेले 'उत्तराखंड' 1991 ते 2013 दरम्यान 6 वेळा हादरले होते; ओढवल्या होत्या अनेक नैसर्गिक आपत्ती, जाणून घ्या सविस्तर)
चंचल यांनी सांगितले की, हिमालयीन क्षेत्रासाठी सध्याच्या विकासाच्या मॉडेलवर पुनर्विचार करण्याची गरज आहे. 2013 मध्ये उत्तराखंडमध्ये अशीच घटना घडली होती. संशोधकांनी ग्लोबल वार्मिंगमुळे असे घडले असल्याचे सांगितले होते, ज्यामुळे हिमनगा वितळत आहे. भविष्यात अशा घटना वारंवार घडू शकतात असा इशाराही त्यांनी दिला होता.