Uttar Pradesh: मेलेली उठली चहा प्यायली आणि पुन्हा मेली, उत्तर प्रदेशमध्ये अंतिम संस्कारापूर्वी अचानक जीवंत झाली महिला; घटना वाचून तुम्हीही व्हाल थक्क

मेली, चहा प्यायली आणि पुन्हा मेली, उत्तर प्रदेशात अजब प्रकाराची जोरदार चर्चा.

ऐकावं ते नवलचं असचं काहीसं म्हणण्याची वेळ आलीये. भारतात चहा प्रेमींची संख्या मोठी आहे. पण चक्क चहा पिण्यासाठी थेट मृत्यूच्या दारातून परत येण म्हणजे चहा प्रती फारचं निखळ प्रेम. उत्तर प्रदेशातून अशाचा एका चहा प्रेमी आजीच्या मृत्यूची अजब कहाणी पुढे आली आहे. वृध्दापकाळाने प्रकृती ठिक नसल्याने आजींना फिरोजाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या आजींवर डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले. २३ डिसेंबर ते ३ जानेवारी असे दहा दिवस या आजींवर उपचार करण्यात आले. पण ३ जानेवारीला आजीच्या ह्रदय आणि मेंदू अचानक काम करणं बंद केलं आणि डॉक्टरांनी अखेर आजींना मृत घोषत केल. या वृध्द महिलेच्या निधनाबाबत  डॉक्टरांनी कुटुंबियांना माहिती दिली आणि मृतदेह घरी घेवून जाण्यास सांगितला. तरी संपूर्ण कुटूंबियांनी इस्पितळ गाठत शोक व्यक्त करत आजींना घरी नेण्याची तयारी केली तसेच घरी आणि स्मशानभुमित आजींच्या अंतिम संस्कारची तयारी सुरु करण्यात आली.

 

कुटुंबियांनी आजीचा मृतदेह घेवून घरी जाण्यास मार्गस्थ झाले. तोच वाटेत रस्त्यावरील खड्ड्यामुळे गाडी उसळली आणि वृध्द महिला अचानक उठून बसली. आजींना उठून बसलेलं बघून दोन मिनिट घरची मंडळी देखील शॉकचं झाली. पण नंतर सगळ्यांना आनंद झाला. आजी अचानक उठून बसल्या आणि उलट्या करु लागल्या. संबंधीत घटनेनंतर आजीला कुटुंबिय घरी घेवून गेले आणि घर गाठल्या नंतर आजीने चहा मागितला. (हे ही वाचा:- Unique Love Story: सासू व जावई प्रेमात आकंठ बुडाले; समाजाची पर्वा न करता घरातून पळून गेले, जाणून घ्या काय पुढे घडले)

 

घरातील पाहूणे मंडळींना देखील आजींनी जिवंत बघून आश्चर्याचा धक्काचं बसला. पण आजींना चहा पितांना बघून सगळ्यांना आनंद झाला, कुटुंबियांनी समाधान व्यक्त केलं. पण कुटुंबियांचा आनंद फार काळ टिकला नाही कारण चहा पिऊन झाल्यानंतर आजीने विश्रांती घेतली पण दुसऱ्या दिवशी  आजी सकाळी उठल्याचं नाही आणि अखेर आजींना मृत घोषित करण्यात आले.