Unique Love Story: सासू व जावई प्रेमात आकंठ बुडाले; समाजाची पर्वा न करता घरातून पळून गेले, जाणून घ्या काय पुढे घडले

सासऱ्याने पुढे सांगितले की, दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याला जाग आली तेव्हा घरात कोणीच नव्हते. त्याने पत्नीचा शोध सुरू केला मात्र ती सापडली नाही. त्यानंतर चौकशी केल्यावर त्यांना समजले की, आपली पत्नी आपल्या जावयासोबत पळून गेली आहे.

Unique Love Story: सासू व जावई प्रेमात आकंठ बुडाले; समाजाची पर्वा न करता घरातून पळून गेले, जाणून घ्या काय पुढे घडले
Couple. Representational Image. (Photo Credits: File)

आजपर्यंत तुम्ही अनेक प्रेमकथा (Love Story) ऐकल्या असतील, पण राजस्थानमधील (Rajasthan) ही प्रेमकहाणी ऐकून नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. ही प्रेमकथा आहे एक जावई (Son-in-Law) आणि त्याच्या सासूची (Mother-in-Law). राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यात एक सासू आपल्या जावयासोबत पळून गेली आहे. माहितीनुसार दोघांमध्ये जवळीक वाढू लागल्यानंतर दोघे एकमेकांवर प्रेम करू लागले व आता ते दोघेही घरातून पळून गेले आहेत. महत्वाचे म्हणजे या सासूला 1 मुलगा व तीन मुली आहेत. या चौघांचीही लग्ने झाली आहे. तर तिच्या मुलीला व जावयालाही 3 मुले आहेत.

सासूला पळवून नेण्यासाठी आधी जावयाने आपल्या सासऱ्यासोबत दारूची पार्टीची आयोजित केली. यामध्ये त्याला भरपूर दारू पाजली. त्यानंतर जावई सासूला घेऊन पसार झाला. जेव्हा सासरा शुद्धीवर आला तेव्हा त्याला पत्नी आणि जावयाच्या कृत्याची माहिती मिळाली. ही गोष्ट ऐकून त्याला धक्काच बसला व तो जागीच बेशुद्ध झाला. त्यानंतर शुद्धीवर येताच त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.

हे प्रकरण सिरोहीच्या अनादरा पोलीस स्टेशन क्षेत्राशी संबंधित आहे. या ठिकाणी सियाकारा गावात एक सासू आपल्या जावयाच्या प्रेमात पडली. या प्रकरणी गुन्हा नोंदवता सासऱ्याने सांगितले की, त्यांच्या मुलीचे लग्न नारायण जोगी नावाच्या व्यक्तीशी झाले होते. लग्नानंतर वरचेवर मुलगी आणि जावई घरी यायचे. असेच 30 डिसेंबर रोजी त्यांचा जावई नारायण जोगी आपल्या सासरी आला व त्याने सासऱ्यांसोबत भरपूर दारू प्यायली. त्यानंतर सासरा दारूच्या नशेत असल्याचा फायदा घेत तो आपल्या सासूसह पळून गेला. (हेही वाचा: Siliguri Shocker: विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या, मृतदेहाचे दोन तुकडे करून फेकले कालव्यात)

सासऱ्याने पुढे सांगितले की, दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याला जाग आली तेव्हा घरात कोणीच नव्हते. त्याने पत्नीचा शोध सुरू केला मात्र ती सापडली नाही. त्यानंतर चौकशी केल्यावर त्यांना समजले की, आपली पत्नी आपल्या जावयासोबत पळून गेली आहे. त्यावेळी त्यांची मुलगी आपल्या सासरी होती. त्यानंतर या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावई आपल्या सासूला घेऊन पळून गेल्याचे प्रकरण समोर आले असून, तपास चालू आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 05, 2023 11:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).