Uttar Pradesh: नवरदेव टकला आहे कळताच नवरी मंडपात बेशुद्ध; शुद्धीवर येताच लग्नास नकार

नवरदेवाला (Groom) खरोखरच टक्कल असून, त्याने विग वापरला असल्याची माहिती नवरीला मंडपात मिळाली. त्यानंतर ती मंडपातच बेशुद्ध पडली. जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा तिने लग्नास नकार दिला.

Indian Marriage | Representational Image (Photo Credits: Pixabay)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) इटावा जिल्ह्यात नवरी (Bride) असलेल्या एका तरुणीने भर मांडवात विवाहास नकार दिला आहे. नवरदेवाला (Groom) खरोखरच टक्कल असून, त्याने विग वापरला असल्याची माहिती नवरीला मंडपात मिळाली. त्यानंतर ती मंडपातच बेशुद्ध पडली. जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा तिने लग्नास नकार दिला. दोन्ही बाजूंच्या कुटुंबीयांनी नवरीला समजावण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही. अखेर विवाह न करताच नवरदेवाला परत फिरावे लागले. या घटनेची जोरदार चर्चा आता सोशल मीडियावर होत आहे.

प्राप्त माहितीनुसार, अजय कुमार असे नवरदेवाचे नाव आहे. अजय कुमार हिचा विवाह उत्तर प्रदेशमधीलच एका तरुणीशी ठरला होता. ठरल्याप्रमाणे सर्व कार्यक्रम सुरु होते. सनई चौघडे वाजत होते. दरम्यान, एकमेकांना वरमाला घालताना नवरीला लक्षात आले की, अजय कुमार हा अत्यंत सावधगिरीने वागतो आहे. त्याचे वागने सामान्य नाही. तो सारखे आपले केस तपासतो आहे.त्यावरुन तिला संशय आला. (हेही वाचा, Mira Road: नवऱ्याने टक्कल असल्याचे लपवल्याने नवविवाहित महिलेकडून पोलिसांत तक्रार दाखल; मिरा रोड येथील घटना)

दरम्यान, नवरीला कोणीतरी सांगितले की, नवरदेव खरोखरच टकला आहे. त्याला मोठे टक्कल आहे आणि लग्नासाठी त्याने केसांचा विग वापरला आहे. हे ऐकून नवरीला प्रचंड धक्का बसला. ती मंडपातच बेशुद्ध पडली. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा तीने लग्नास नकार दिला. वधू आणि वराच्या कुटुंबीयांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही उपयोग झाला नाही. नवरी या मुलाशी मी लग्नच करणार नाही यावर ठाम होती. अखेर कोणाचाच काही ईलाज चालला नाही. नवरदेवास विना लग्नाचे तसेच परत यावे लागले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif