Indo Islamic Cultural Foundation Trust: उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाकडून अयोध्यामध्ये मशिदीच्या बांधकामासाठी ट्रस्टची घोषणा; 15 सदस्य, झुफर फारुखी अध्यक्ष 

वक्फ बोर्डाने जाहीर केलेल्या ट्रस्टमध्ये सध्या नऊ सदस्यांची नावे जाहीर केली आहेत.

UP Sunni Waqf Board office | (Photo Credits: ANI)

उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने (Uttar Pradesh Sunni Central Waqf Board) बुधवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, अयोध्या (Ayodhya) येथे वाटप केलेल्या जागेवर मशिदीच्या बांधकामासाठी ट्रस्टच्या सदस्यांची नावे जाहीर केली. वक्फ बोर्डाने जाहीर केलेल्या ट्रस्टमध्ये सध्या नऊ सदस्यांची नावे जाहीर केली आहेत. उर्वरित सहा सदस्य सहमतीने निवडले जातील, अशी माहिती वक्फ बोर्डाचे अध्यक्ष झुफर अहमद फारुखी (Zufar Ahmad) यांनी दिली. झुफर अहमद फारूकी यांनी 'भाषा' ला सांगितले की, अयोध्येत धन्निपूर  (Dhannipur) गावात वाटप केलेल्या पाच एकर जागेवर मशिद, इंडो-इस्लामिक रिसर्च सेंटर, ग्रंथालय आणि रुग्णालय बांधण्यासाठी मंडळाने 'इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन' (Indo-Islamic Cultural Foundation) नावाने एक ट्रस्ट स्थापन केला आहे.

या ट्रस्टमध्ये सध्या एकूण नऊ सदस्य आहेत. बोर्ड स्वतःच त्याचे संस्थापक विश्वस्त असेल आणि मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्याचा कार्यकारी प्रतिनिधी असतील. याशिवाय ते स्वत:च या ट्रस्टचे मुख्य विश्वस्त व अध्यक्ष असतील, असे फारुखी म्हणाले. 9 नोव्हेंबरला, सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमी येथील बाबरी मशीद वादाचा ऐतिहासिक निर्णय देताना, वादग्रस्त ठिकाणी राम मंदिर बांधण्याचे आणि मुस्लिमांना मशिदीच्या बांधकामासाठी पाच एकर जमीन अयोध्येतील एका प्रमुख ठिकाणी देण्याचे आदेश दिले होते. अयोध्या जिल्ह्यातील सोहावल तालुक्यातील धन्नीपूर गावात वक्फ बोर्डाला पाच एकर जमीन देण्यात आली आहे. (हेही वाचा: अयोध्या राम जन्मभूमी मंदिर जमिनीखाली टाइम कॅप्सूल पुरण्याचे वृत्त चुकीचे; मंदिराच्या ट्रस्टने दिले 'हे' स्पष्टीकरण)

एएनआय ट्वीट -

सुन्नी वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी- विश्वस्त

वक्फ बोर्डाने याठिकाणी मशिद तसेच त्या जागेवर इंडो-इस्लामिक रिसर्च सेंटर, हॉस्पिटल आणि लायब्ररी तयार करण्याची घोषणा केली होती. हे सर्व बांधकाम कसे होईल याचा निर्णय घेण्यासाठी हा ट्रस्ट स्थापन केला जाणार होता. अयोध्येत 5 ऑगस्टला राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या जोरदार तयारी दरम्यान, ‘राम नगरी’ मध्ये मशिदीच्या बांधकामाशी संबंधित गोष्टी थंडावल्या आहेत. मशिदीच्या जमिनीबाबतही अद्याप काही औपचारिकता बाकी आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने निवडलेली जमीन ही सरकारी जमीन असून ती कृषी विभागाची आहे. या जागे जवळच शाह गदा बाबांची जुनी समाधी आहे, जिथे दरवर्षी उर्स दरम्यान परिसरातील लोक मोठ्या संख्येने येतात.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif