Uttar Pradesh Shocker: भाजप नेत्याच्या मुलीने विनयभंगाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

तो व्हिडिओ व्हायरल करण्याची सारखी धमकी तो पीडितेला देत होता. त्यामुळे पीडिता घाबरली होती. आरोपीच्या सततच्या छळाला कंटाळून तिने जीवन संपवलं आहे.

Suicide | (Photo Credits: unsplash.com)

उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) गुन्हेगारी चांगलीच वाढली आहे. आता अशीच एक धक्कादायक घटना रामपूरमधून (Rampur) समोर आली आहे. एका भाजप नेत्याच्या आठवीत शिकणाऱ्या मुलीने विनयभंगाला (Molestation) कंटाळून टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. भाजप महिला मोर्चाच्या नेत्याच्या मुलीने मंगळवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या (Uttar Pradesh BJP Leaders ) केली. ही मुलगी आठवीत शिकत होती. विनयभंगाला कंटाळून तिने हे कृत्य केल्याचे सांगितलं जात आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. ( Karnataka Shocker: कर्नाटकातील कोप्पलमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, पतीला मारहाण; 6 आरोपींना अटक)

आरोपीने पीडितेचा एक अश्लील व्हिडिओ बनवला होता. तो व्हिडिओ व्हायरल करण्याची सारखी धमकी तो पीडितेला देत होता. त्यामुळे पीडिता घाबरली होती. आरोपीच्या सततच्या छळाला कंटाळून तिने जीवन संपवलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रामपूरमध्ये आठवडाभरात दोन विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

यापूर्वी शहजादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अशीच घटना घडली होती. एका तरूणीने विनयभंगाला कंटाळून जीवन संपवलं होतं. ही घटना शहजादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली होती. 19 वर्षीय पीडित तरूणी मिलकच्या पदवी महाविद्यालयात बीएच्या द्वितीय वर्षात शिकत होती. तिची परीक्षा चालू होती. ती 27 जानेवारीला परीक्षा देणार होती.