Uttar Pradesh Shocker: लग्नाच्या 6 व्या दिवशी नववधुने दिला बाळाला जन्म, बातमी कळताच नवऱ्याने दिला तलाक

त्यानेच तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते, अशी कबुली दिली.

Baby | Representational image (Photo Credits: pxhere)

उत्तर प्रदेशमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. राज्यातील मुरादाबादमध्ये जल्लोषात लग्न करत नवरीला घेऊन नवरा मुलगा घरी आला. घरात नववधूचं आगमन झाल्याने आनंदाचं वातावरण होतं. कुठेतरी देवदर्शनाला जाऊ आणि सुखी संसाराची सुरुवात करु, असा विचार नवऱ्या मुलाच्या मनात होता. पण लग्नाच्या 6 दिवसातच नवऱ्या मुलीने बाळाला जन्म दिला. यानंतर नवऱ्या मुलासह सासरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. नवरी प्रेग्नेंट आहे, याची कल्पना नवऱ्या मुलाला त्याच्या घरच्यांना नव्हती. या प्रकारानंतर त्याने नववधूला स्विकारण्यास नकार दिला आणि तीला तिहेरी तलाक दिला. (हेही वाचा - Sugar Export Ban: साखरेच्या निर्यातीवरील बंदी 31 ऑक्टोबर नंतरही जारी राहणार; DGFT चं नोटिफिकेशन)

मुराबाद शहरातील मुघलपुरा परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचा आगवानपूर येथील रहिवासी असलेल्या तरुणीसोबत आठवडाभरापूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर नवरा मुलगा नवरीला घरी घेऊन आला. घरात नववधूचं आगमन झाल्यानंतर आनंदाचं वातावरण होतं. लग्नानंतर चौथ्या दिवशी नववधू माहेरी गेली. तिथे तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. मुलीच्या आई वडिलांनी या घटनेची माहिती मुलाच्या कुटुंबियांना दिली. यावरुन दोन्ही कुटुंबियांमध्ये बरीच बाचाबाची झाली.

तरुणीची चौकशी केली असता तिने शेजारी राहणाऱ्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचं सांगितलं. त्यानेच तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते, अशी कबुली दिली. मुलीने बाळाला घेऊन सासरच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सासरच्यांनी तिला घराबाहेर हाकललं. आता हे प्रकरण पोलिसांत गेलं असून तिहेरी तलाक देणाऱ्या नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी नवरीने केली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif