UP Shocker: तक्रार दाखल करण्यास आलेल्या पीडित महिलेवर पोलिसांकडून धावत्या वाहनात बलात्कार
या प्रकरणी आता प्रयागराज पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली असून एका उपनिरीक्षकाला निलंबित केले आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास हा सुरु आहे.
प्रयागराजमधून एक मोठे प्रकरण समोर आले आहे. एका दलित महिलेवर मद्यधुंद अवस्थेत जंघई पोलीस चौकीच्या प्रभारीसह चार जणांविरुद्ध सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप हा लावण्यात आला आहे.चालत्या कारमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि त्याचा अश्लील व्हिडिओही बनवण्यात आल्याचे महिलेने सांगितले. या प्रकरणाचा तपास एसीपी हंडिया यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. प्रयागराज-वाराणसी महामार्गावरील दुर्गागंज मार्केटमध्ये इन्स्पेक्टर आणि इतर 3 कॉन्स्टेबलने कोल्ड ड्रिंकमध्ये नशा करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे. (हेही वाचा - Marriage Scam in UP: गाझियाबादमध्ये समोर आला कोट्यावधी रुपयांचा 'विवाह घोटाळा'; कन्या विवाह योजनेंतर्गत लावली 3500 जोडप्यांची खोटी लग्ने, जाणून घ्या सविस्तर)
सरयम्मरेज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मधाईपूर येथे राहणाऱ्या एका दलित महिलेने सांगितले की, आठवडाभरापूर्वी तिला तिच्या मोबाईलवर धमकीचा फोन आला होता. याबाबत तक्रार करण्यासाठी तिने जंघई पोलीस चौकी गाठली होती. चौकी इन्चार्ज सुधीर पांडे यांनी कारवाई होईल, असे सांगून मला घरी पाठवले होते.
महिलेचा आरोप आहे की, 21 सप्टेंबर रोजी संध्याकाळी चौकीचे प्रभारी सुधीर पांडे यांनी तिला बोलावले. धमकीचा फोन करणारी व्यक्ती भदोही येथील रहिवासी असल्याचे सांगितले. सुधीर पांडे यांनी मला त्यांच्यासोबत भदोहीला जायला सांगितले. मी मान्य केले. संध्याकाळी सहा वाजता पोस्टावर पोहोचलो. येथून सुधीर पांडे यांच्या कारमध्ये (UP32JN0573) बसून आम्ही भदोहीकडे निघालो. वाटेत सुधीर पांडेने तिला दुर्गागंजजवळ जबरदस्तीने कोल्ड ड्रिंक प्यायला दिले. यानंतर मी अर्ध बेशुद्ध झाले. त्यानंतर तासनतास माझ्यावर बलात्कार झाला. अश्लील व्हिडीओही बनवला आल्याचे महिलेने सांगितले.
दरम्यान या प्रकरणी आता प्रयागराज पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली असून एका उपनिरीक्षकाला निलंबित केले आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास हा सुरु आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 27, 2023 10:31 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

