Uttar Pradesh Politics: योगी आदित्यनाथ यांना धक्का,  राज्यमंत्री दिनेश खटीक यांचा राजीनामा; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लिहिले पत्र

त्या विरोधात सत्ताधारी भाजप फारच एकसंध असल्याचे सांगितले जात नाही. प्रत्यक्षात मात्र तसे आहेच असे दिसत नाही. खास करुन उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) भाजपामध्ये बरीच खदखद असल्याचे दिसते. प्रामुख्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Dinesh Khatik) यांच्या विरोधात ही खदखद अधिक दिसते.

योगी आदित्यनाथ (Photo Credit: PTI)

देशभरात विरोधी पक्षाची वाताहात होत असल्याचे चित्र आहे. त्या विरोधात सत्ताधारी भाजप फारच एकसंध असल्याचे सांगितले जात नाही. प्रत्यक्षात मात्र तसे आहेच असे दिसत नाही. खास करुन उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) भाजपामध्ये बरीच खदखद असल्याचे दिसते. प्रामुख्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या विरोधात ही खदखद अधिक दिसते. योगींच्या मंत्रिमंडळातील राज्यमंत्री दिनेश खटीक (Dinesh Khatik) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपण दलित असल्याने आपली बाजू, म्हणने ऐकले जात नाही, असा आरोप करत खटीक यांनी राजीनामा दिला आहे. खटीक यांनी आपला राजीनामा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)

यांच्याकडे दिल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, दुसरे एक मंत्री जितिन प्रसाद हे देखील योगींवर नाराज असल्याचे समजते.

दिनेश खटीक यांनी आपल्या पत्रात म्हटले आहेकी, आपण दलित आहोत. या कारणास्तव आपल्याकडे दूर्लक्ष केले जात आहे. नमामी गंगा आणि हर घर जल योजना या नियमांकडेही दुर्लक्ष केले जात आहे. बदल्या आणि बडत्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होताना दिसत आहे. मी अनेकदा याविषयी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, मी दलित असल्याने माझ्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मंत्री म्हणून मंत्रिमंडळात माझे काहीच अस्तित्व नाही. माझ्यासाठी राज्य मंत्री म्हणून काम करणे दलित समाजासाठी निष्फळ आहे. त्यामुळे मला ना मंत्रिमंडळ बैठकिला बोलावेले जाते. ना मला त्याबाबत सांगितले जाते. अपमानित होण्यापेक्षी मी पदाचा राजीनामा देतो, असेही खटीक यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Uttar Pradesh: गोरखपूरमध्ये पाऊस पडावा म्हणून लावले बेडकांचे लग्न; पूर्ण विधीपूर्वक पार पडला सोहळा (See Photos))

जल संसाधन राज्य मंत्री दिनेश खटीक यांच्या राजीनाम्याबाबत आगोदरच अंदाज बांधले जात होते. सांगितले जात आहे की, दिनेश खटीक आपल्या विभागाचे वरिष्ठ मंत्री स्वतंत्र देव सिंह यांच्याविषयी नाराज आहेत. मंगळवारी खटीक कॅबिनेट मीटिंगमधये सहभाही झाले होते. त्यानंतर त्यांनी सरकारी वाहन सोडून मेरठ येथील आपल्या घरी ते चालत गेले. सांगितले जात आहे की, जलशक्ती विभागात झालेल्या बदल्यांवेळी त्यांच्या शिफारशी ऐकण्यात आल्या नाहीत. तसेच, कामाचे स्पष्ट वाटप न झाल्याने त्यांच्याकडे करण्यासारखेही विशेष काही राहिले नाही. दिनेश यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनंतर त्यांनी आपला फोन स्विच ऑफ करुन दिला आहे.