Uttar Pradesh: सरकारी अधिकाऱ्याची महिला कर्मचाऱ्यासोबत छेडछाड (Watch Video)

उत्तर प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाच्या ट्विटर हँडलवरुनही हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कौशांबी (Kaushambi District) जिल्ह्याच्या एका कथीत सरकारी कार्यालयातील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाच्या ट्विटर हँडलवरुनही हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. व्हिडिओत दिसते की, सहीसाठी रजिस्टर घेऊन आलेल्या एका महिला कर्मचाऱ्यासोबत खुर्चीवर बसलेला एक व्यक्ती छेडछाड करतो आहे. हा व्यक्ती या कार्यालयातील अधिकारी असून त्याचे नाव रामनाथ राम असल्याचे समजते. रामनाथ राम हे ग-हस्थ जिल्हा प्रोबेशन अधिकारी (DPO) पदावर कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे.

समाजवादी पक्षाने आपल्या ट्विटर हँडलवर व्हिडिओसह हिंदीत भाषेत पोस्ट केली आहे. या पोस्टचा मराठी भावार्थ असा की, यूपीच्या सरकारी कार्यालयात काय चालते? यूपीच्या सरकारमध्ये हे चालते. हे यूपीचे कौशांबी जिल्ह्याचे जिल्हा प्रोबेशन अधिकारी रामनाथ राम यांची कृती आहे. समाजवादी पक्षाने हे व्हिडिओ असलेले हे ट्विट उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya) यांनाही टॅग केले आहे. सोबत हा अधिकारी आपल्या संरक्षणातच हे दुष्कृत्य करतो आहे का? असा सवाल विचारत असे किती काळ चालणार असेही म्हटले आहे. (हेही वाचा, Shocking Video: क्रूरतेचा कळस! घरात काम करणाऱ्या मुलीला मालकिणीची मारहाण; लिफ्टमधून ओढत बाहेर घेऊन गेली, पहा CCTV फुटेज)

ट्विट

व्हिडिओत पाहायला मिळते की, कथीत अधिकारी रामनाथ राम हे महिला कर्मचाऱ्याचा हात जबरदस्तीने पकडू पाहात आहेत. तिच्यासोबत जबरदस्ती करु पाहात आहेत. रामनाथ राम यांच्या वर्तनाला महिला विरोध करत आहे तरीही ते जबरदस्तीने हात पकडू पाहात आहेत. पीडित महिला कर्मचारी वन स्टॉप सेंटरवर कर्तव्यावर असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना घडल्याच्या चार दिवस आगोदरच रामनाथ राम यांच्यावर जिल्हा प्रेबेशन ऑफिसमध्ये तैनात असलेल्या एका महिला अधिकाऱ्यासोबत छेडछाडीचा आरोप झाला होता. आता थेट व्हिडिओच पुढे आला आहे. पीडितेने सदर अधिकाऱ्याविरोधात प्रयागराज च्या महिला पोलिसांत तक्रारही दिली आहे.