Uttar Pradesh Assembly Election 2022: भीम आर्मी उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांची चिंता वाढवणार? भाजप विरोधात समाजवादी पक्ष, RLD सोबत आघाडीचे संकेत

चंद्रशेख आजाद रावण यांनीच तसे संकेत दिले आहेत.

Chandrashekhar Azad | (Photo Credits: Facebook)

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 (Uttar Pradesh Assembly Election 2022) मध्ये चंद्रशेखर आजाद (Chandrashekhar Azad Ravan) यांची भीम आर्मी (Bhim Army) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोरील चिंता अधिक वाढविण्याचे संकेत आहेत. भारतीय जनता पक्ष (BJP) विरोधात विधानसभा निवडणुकीत भीम आर्मी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्ष (Samajwadi Party) आणि राष्ट्रीय लोक दल (RLD) आदी पक्षांसोबत आघाडी करणार असल्याची चर्चा आहे. चंद्रशेख आजाद रावण यांनीच तसे संकेत दिले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रशेखर आजाद यांनी म्हटले आहे की, आगामी निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि आरएलडडी पक्षासोबत आघाडी होऊ शकते. उत्तर प्रदेशला चांगले सरकार देण्याचा आमचा प्रयत्न राहील असेही आजाद म्हणाले. उत्तर प्रदेशमधील हुकुमशाही आणि निरंकुश सरकार थांबविण्यासाठी भाजपला रोखण्याची आवश्यकता असल्याचेही आजाद यांनी म्हटले आहे.

आजाद यांनी पुढे म्हटले की, आमची सर्वांसोबत चर्चा सुरु आहे. जसजशा गोष्टी निष्कर्षापर्यंत पोहोचतील तसतसे आम्ही माहिती देत जाऊ. आजद यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, उत्तर प्रदेशमध्ये जंगलराजसदृश्य स्थिती आहे. सर्वत्र भीती आणि असुरक्षेचे वातावरण आहे. नागरिकांनाच्या हाताला काम नाही. युवकांना रोजगार नाही. त्यामुळे अशा बिनकामाच्या सरकारला थांबविण्याचे आमचे ध्येय आहे. (हेही वाचा, Uttar Pradesh: दारु, बियरच्या दुकानांवरुन हटवणार 'सरकारी' आणि 'ठेका' शब्द; योगी सरकारचा मोठा निर्णय)

चंद्रशेखर आजाद यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसवर टीका करताना आजाद यांनी म्हटले की, काँग्रेसच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक आहे. उत्तर प्रदेशमध्ये दलितांची हत्या झाल्या काँग्रेस उघडपणे बोलते. मात्र, काँग्रेसच्या राजवटीत असे काही घडल्यास काँग्रेस ब्रसुद्धा उच्चारत नाही. त्यामुळे काँग्रेसच्या वागणे आणि बोलण्यात फरक आहे. त्यामुळे आम्ही काँग्रेससोबत जाणार नसल्याचे आजाद म्हणाले.

दरम्यान, आजाद यांनी मायावती यांच्यावरही जोरदार टीका केली. केवळ 'CBI' आणि 'ED' यांसारख्या संस्थांच्या कारवाईची भीती असल्यामुळे मायावती उघडबणे काहीच बोलत नाहीत. त्याचा परिणाम संपूर्ण दलित समाजाला भोगावा लागतो. मायावतींनी चंद्रशेखर यांना 'वोट कटवा' म्हणून संबोधले होते. यावर त्या मला काहीही बोलू शकतात, असे चंद्रशेखर म्हणले. साथ बलात्कार हो रहा है. नौजवानों को रोजगार नही मिल रहा है और पुलिस यहां केवल तमाशा देख रही है.