Uttar Pradesh: अलीगढ येथे 4 वर्षांच्या मुलीवर नातेवाईकाकडून बलात्कार; पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरु

हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरण ताजे असतानाच राज्यातील विविध ठिकाणांहून बलात्काराच्या घटना समोर येत आहेत.

Image Used for Representational Image Only | (Photo Credits: Latestly/Illustration)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. हाथरस सामुहिक बलात्कार (Hathras Gangrape) प्रकरण ताजे असतानाच राज्यातील विविध ठिकाणांहून बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न पुन्हा एका उभा राहिला आहे. दरम्यान, अलीगढ (Aligarh) येथे 4 वर्षांच्या मुलीवर नातेवाईकाकडूनच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना खैर पोलिस ठाण्याच्या (Khair Police Station) हद्दीत घडली आहे.

पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती ठीक आहे. तिच्यावर नातेवाईकाकडून बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आम्ही लवकरात लवकर आरोपीला पकड्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (बलात्काराच्या घटनांमध्ये भारतातील 'हे' 10 राज्य आहेत अतिशय घातक; राजस्थानमध्ये सर्वाधिक भयानक परिस्थिती, तर महाराष्ट्रात 55 टक्क्यांनी वाढलेत बलात्कार प्रकरणं)

ANI UP Tweet:

दरम्यान, सध्या देशात हाथरस गँगरेप प्रकरण धुमसत आहे. या प्रकरणावरुन उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिस यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधला आहे. शनिवारी, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.

काय आहे हाथरस गँगरेप प्रकरण?

हाथरस येथे 14 सप्टेंबर रोजी गुरांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या 19 वर्षीय मुलीवर 4 जणांनी बलात्कार करुन तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. यात पीडित मुलगी जबर जखमी झाली. तिच्यावर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र 29 सप्टेंबर रोजी तिची मृत्यूची झुंज अपयशी ठरली. तिच्यावर युपी पोलिसांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळेस पीडितेच्या कुटुंबियांना घरात कोंडून ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर मीडिया, राजकीय नेते यांनाही तिथे जाण्यापासून अडवण्यात येत होते. त्यामुळे युपी सरकार आणि पोलिसांकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात होते.