धक्कादायक! सर्वसामान्य ग्राहकाला 128 कोटी 45 लाख 95 हजार 444 रुपयांचे वीज बील; महामंडळाचा अजब कारभार

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील हापूड (Hapur) जिल्ह्यातील चमरी (Chamri) गावचे रहिवासी शमीम यांच्यासोबत हा प्रकार घडला

A resident of Chamri | (Photo Credits: ANI)

सर्वसामान्य आयुष्य जगत असलेल्या एका गरीब नागरिकाच्या राहत्या घराचे वीजबील चक्क 128 कोटी 45 लाख 95 हजार 444 रुपये इतके आले आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील हापूड (Hapur) जिल्ह्यातील चमरी (Chamri) गावचे रहिवासी शमीम यांच्यासोबत हा प्रकार घडला. राजधानी दिल्लीपासून अवघ्या 55 किलोमीटर दूर अंतरावर हे गाव आहे. वीज महामंडळाकडून आलेल्या वीज बील (Electricity Bill) पत्रकावरील आकडा पाहून, या वृद्ध नागरिकाच्या पायाखालची जमीनच सरकली. धक्कादायक म्हणजे सुरुवातीला या वृद्ध नागरिकास वीज बीलावरचा आकडाच वाचता येत नव्हता. पण, जेव्हा त्यांना तो समजला ते पाहून ते चक्कर येऊन पडणेच बाकी होते.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ग्राहक शमीम हे महामंडळाच्या वीजेचा वापर हा केवळ घरगुती कारणासाठी करतात. जसे की, ट्यूब लाईट, बल्ब, पंखा, टीव्ही आणि इस्त्री वैगेरे. आजवर त्यांना आलेलेल बील हे नेहमी 700 ते 800 रुपयांच्या आसपास असायचे. फारफार तर 1000 रुपये वैगेरे. पण, अचानक आलेले हे बिल पाहून शमीम हे चांगलेच हबकून गेले. आता ते वीज बील घेऊन महामंड कार्यालयाच्या चकरा मारत आहेत.

दरम्यान, संपूर्ण वीज बील भरल्याशिवाय आपला खंडीत केलेला वीजपूरवठा पूर्ववत केला जाणार नसल्याचे वीज वितरण कार्यालयाने या ग्राहकाला सांगितल्याचे समजते. (हेही वाचा, वाढत्या वीज बिलाची MERC ने घेतली दाखल; मीटर आणि बिल यांची होणार चौकशी)

एएनआय ट्विट

सर्वसामान्य ग्राहकांना इतक्या महाकाय रकमेचे आलले वीज बील पाहून प्रसारमाध्यामांनीही या प्रकाराची दखल घेतली. स्थानिक प्रसारमाध्यमांनी संबंधीत विज महामंडळ कार्यालयात जाऊन माहती घेतली. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, संबंधित ग्राहकास इतके बिल कधीच येत नाही. काही तांत्रिक कारणांमुळे मीटर चुकुचे रीडिंग दाखवतो किंवा कधी कधी प्रिंट मिस्टेक झाल्यानेही असे प्रकार घडतात. कार्यालयाने घडल्या प्रकाराची नोंद घेतली आहे. या ग्राहकाची समस्या लवकरच सोडवण्यात येईल. तसेच, त्याला त्याच्या वीज वापराईतक्या बीलाची रक्कमही कळवली जाईल.