UP Election 2022: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान संपले, भाजपचा 50 जागा जिंकण्याचा दावा
पश्चिम उत्तर (Uttar Pradesh) प्रदेशातील 11 जिल्ह्यांतील 58 विधानसभा मतदासंघात हे मतदान पार पडले. मतदान पार पडल्यानंतर भाजपने (BJP) एकूण 58 विधानसभा मतदारसंघापैकी 50 जागा जिंकण्याचा दावा केला.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (UP Election 2022) पहिल्या टप्प्यातील मतदान आज (10 फेब्रुवारी) पार पडले. पश्चिम उत्तर (Uttar Pradesh) प्रदेशातील 11 जिल्ह्यांतील 58 विधानसभा मतदासंघात हे मतदान पार पडले. मतदान पार पडल्यानंतर भाजपने (BJP) एकूण 58 विधानसभा मतदारसंघापैकी 50 जागा जिंकण्याचा दावा केला. पहिल्या टप्प्यासाठी दिवसभरात 60.17% मतदान झाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दावा केला की, सकाळपासून होत असलेल्या मतदानाची टक्केवारी पाहाता भजपच्या डबल इंजिन सरकारला जनता पुन्हा एकदा पुन्हा बहुमत देईल.
योगी आदित्यनाथ यांनी पुढे म्हटले की, भाजप सरकारच्या काळात उत्तर प्रदेश राज्यात कोणत्याही प्रकारचा हिंसाचार, दंगा झाला नाही. या आधी जे लोक हिंसाचारात सहभगी असत, गुन्हे करत त्यांच्या घरी आज भयान शांतता आहे. कारण 11 मार्चला त्यांची उलटी गिणती सुरु होणार आहे. त्यांनी म्हटले की, जे लोक दंगा करतात त्याच्या अनेक पिढ्या भरपाई करण्यात जातील. कारण त्यांचे फोटो चौकाचौकात लावले जातील. (हेही वाचा, Rahul Gandhi on PM Narendra Modi: राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे येते हसू, म्हणाले 'मी त्यांना घाबरतही नाही')
उत्तर प्रदेशचे भाजप प्रवक्ते हरीश चंद्र श्रीवास्तव यानी आयएनएससोबत बोलताना सांगितले की, पहिल्या टप्प्यात विधानसभा निवडणुकीत भाजप 50 जागा सहज जिंकेल. 2017 मध्येही पक्षाने 58 पैकी 53 जागा जिंकल्या होत्या. आता पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. या टप्प्यातही हिच पुनरावृत्ती पाहायला मिळेल.