UP Election 2022: काँग्रेसकडून 125 उमेदवारांच्या नावांची पहिली लिस्ट जाहीर, उन्नाव मधील पीडितेच्या आईला ही मिळाले तिकिट

याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून उत्तर प्रदेशातील निवडणूकीसाठी उमेदवारांची पहिली लिस्ट जाहीर करण्यात आली आहे.

Congress | (File Image)

UP Election 2022: उत्तर प्रदेशात विधानसभेचे बिगुल वाजल्याने आता राजकीय पक्षांकडून आपल्या उमेदावारांच्या नावांची घोषणा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून उत्तर प्रदेशातील निवडणूकीसाठी उमेदवारांची पहिली लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंक गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फ्रेंन्सिंगच्या माध्यमातून उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. पहिल्या लिस्टमध्ये 125 उमेदवारांची नावे असून त्यात 50 महिला आहेत. काँग्रेसने उन्नाव मधील बलात्कार पीडितेची आई आशा सिंह यांना सुद्धा तिकिट दिले आहे.

पहिल्या लिस्टमध्ये 40 टक्के महिला आणि 40 टक्के तरुण आहेत. महिलांमध्ये काही पत्रकार, एक अभिनेत्री, काही संघर्षातील महिला, अशा महिला ज्यांना आपल्या आयुष्यात अत्याचार पाहिले आणि त्याच्या विरोधात लढल्या, काही समाजसेविका.(UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेश मध्ये शिवसेना विधानसभा निवडणूकीसाठी कोणासोबतही युती करणार नाही - शिवसेना नेते संजय राऊत)

Tweet:

काँग्रेसच्या पहिल्या यादित फर्रुखबाद येथून पक्षातील वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांची पत्नी लुईल खुर्शीद, प्रतापगड जिल्ह्यातील रामपूर खास जागेवर आराधना मिश्रा मोना यांना सुद्धा तिकिट दिले गेले आहे. मोना काँग्रेस नेता प्रमोद तिवरी यांची मुलगी आहे. तर शाहजहांपुर येथून आशा वर्कर पूनम पांडेय यांना संधी दिली आहे. तसेच नोएडा येथून पंखुडी पाठक यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात 10 जानेवारी, दुसऱ्या टप्प्यात 14 जानेवारी, तिसऱ्या टप्प्यात 20 जानेवारी, चौथ्या टप्प्यात 23 जानेवारी, पाचव्यामध्ये 27 जानेवारी आणि सहाव्या टप्प्यात 3 मार्च रोजी मतदान होणार आहे. सातव्या टप्प्यासाठी 7 मार्च रोजी प्रवेश केला जाईल. 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.