UP: निकाहापूर्वी मागीतले 10 लाख रुपये, बँक्वेट हॉलमध्येच नवरदेवाला धू-धू धुतले
या व्हिडिओमध्ये एका बँक्वेट हॉलमध्ये नवरदेवाला जोरदार धूतल्याचे समोर आले आहे.
UP: उत्तर प्रदेशातील गाजियाबाद मध्ये एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका बँक्वेट हॉलमध्ये नवरदेवाला जोरदार धूतल्याचे समोर आले आहे. हा व्हिडिओ 12 डिसेंबरचा असल्याचे सांगितले जात आहे. नवरदेवाला केलेल्या या मारहाणीचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. तर जेवण जेवल्यानंतर नवरा मुजम्मिल हुसैन आणि त्याचे वडिल महमूद हुसैन यांनी निकाहापूर्वी 10 लाख रुपयांची रोकड मागितली. पण पैसे न दिल्यास निकाह सुद्धा करणार नाही असे ही त्यांनी सांगितले.(Shocking! आई-मुलाच्या नात्याला काळिमा; सतत रडते म्हणून आईने आपल्या 27 दिवसांच्या बाळाचे डोके भिंतीवर आपटून मारून टाकले)
तक्रारकत्यांनी असे म्हटले की, आधीच 3 लाख रुपयांची रोकड आणि जवळजवळ एक लाख रुपयांची डायमंडची रिंग ही दिली. याच दरम्यान, नवविवाहित मुलीच्या परिवाराला कळले की, नवऱ्याचे यापूर्वी सुद्धा काही मुलींशी निकाह केला होता. त्याच्या बहिणीला सुद्धा फसवून निकाह होणार होता.(Cabinet Meeting Update: मुलींच्या लग्नाचे वय वाढवण्याच्या प्रस्तावाला मोदी कॅबिनेटकडून मंजुरी, आता संसदेत सादर केले जाणार बिल)
नवऱ्याचा खोटारडेपणा समोर आल्यानंतर लोक संतप्त झाले आणि त्याला धू-धू धुतले. व्हायरल व्हिडिओ मध्ये असे दिसून येत आहे की, नवरदेवाची जोरदार धुलाई केली गेली. नवरदेवाची धुलाई करतेवेळीच लग्नासाठी आलेली मंडळी निघून गेली. याच दरम्यान, पोलिसांना सुद्धा या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी असे म्हटले की, तपासानंतर दोषींच्या विरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे.