PM Modi Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार, मोदी कॅबिनटमध्ये तरुणांसोबतच Ph.D, MBA, पोस्ट ग्रेजुएट चेहऱ्यांच्या समावेशाची शक्यता
मंत्रिमंडळात जवळपास दोन डझन मंत्री ओबीसी समूहातून असतील. याशिवाय छोट्या समूहालाही संधी दिली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय काही महिला नेत्यांनाही मंत्रीपदाची संधी दिली जाईल. शिवाय प्रशासकिय अनुभव असणाऱ्यांन प्राधान्य दिले जाऊ शकते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप (BJP) प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Union Cabinet Expansion) आज (7 जुलै) सायंकाळी सहा वाजता पार पडणार असल्याचे वृत्त आहे. अनेक गोपीनीय, जाहीर चर्चा, बैठका झाल्यानंतर अखेर या मंत्रिमंडळ विस्तारास मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारी, आगामी काळात विविध राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका आणि लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) अशा सर्व गोष्टींना डोळ्यासमोर ठेऊन हा मंत्रिमंडळ विस्तार पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी महाराष्ट्र आणि देशभरातून अनेक चेहऱ्यांची नावे चर्चेत आहेत. अधिकृतपणे या चर्चेला कोणीच दुजोरा दिला नाही. त्यामुळे प्रत्यक्षात मंत्रिमंडळ विस्तार होईल किंवा सरकार अथवा भाजपच्या वतीने त्याबाबत अधिकृत काही सांगितले जाईल तेव्हाच सर्व बाब स्पष्ट होणार आहेत. असे असले तरी या वेळी मोदी मंत्रीमंडळात तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. तसेच, या वेळी पीएचडी, एमबीए, पोस्ट ग्रेजुएट मंडळींनाही संधी मिळेल अशी चर्चा आहे. अर्थात मंत्रिमंडळातीह अनेक चेहरे शिक्षित उच्चशिक्षीत आहेत. परंतू, उच्चशिक्षीत तरुण चेहऱ्यांकडे यावेळी जबाबदारी सोबवली जाऊ शकते.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, मंत्रिमंडळ विस्तारात प्रामुख्याने राज्यांना डोळ्यासमोर ठेऊन स्थान दिले जाईल. मंत्रिमंडळात जवळपास दोन डझन मंत्री ओबीसी समूहातून असतील. याशिवाय छोट्या समूहालाही संधी दिली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय काही महिला नेत्यांनाही मंत्रीपदाची संधी दिली जाईल. शिवाय प्रशासकिय अनुभव असणाऱ्यांन प्राधान्य दिले जाऊ शकते. (हेही वाचा, Union Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवास्थानी महत्त्वाची बैठक)
चर्चीत चेहरे
केंद्रीय कॅबिनेटमध्ये समावेश होणाऱ्या नावांमध्ये प्रामुख्याने ज्योतिरादित्य सिंधिया, सर्बानंद सोनोवाल, पशुपति पारस, नारायण राणे आणि वरुण गांधी यांच्या नावाचा समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार, ज्योतिरादित्य सिंधिया, नारायण राणे यांच्यासह अनेक भाजप नेते दिल्लीला पोहोचले आहेत. त्यामुळे मंत्रिपदाच्या शर्यतीत कोण बाजी मारते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
केंद्रीय नेतृत्वाचे सर्व लक्ष सध्या आगामी काळात होणाऱ्या उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका आणि लोकसभा निवडणूक 2024 कडे लागले आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये जर सत्ता मिळवायची तर आतापासूनच तयारी ठेवावील लागेल असे केंद्रीय नेतृत्वाला वाटत असावे. कदाचित त्यामुळेच हे सर्व फेरबदल सर्व शक्यता डोळ्यासमोर ठेऊन केल्या जात असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.