Underworld Don Chhota Rajan: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन उर्फ Rajendra Nikalje एम्स रुग्णालयात दाखल, तिराह तुरुंगात करोना व्हायरस संसर्ग झाल्याचे वृत्त
यात मोक्का आणि खंडणी प्रकरणातीलही गुन्हे आहेत. त्याला विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा झाली आहे. यात पत्रकार जे. डे. प्रकरणात जन्मठेप, दिल्ली एथिक बोगस पासपोर्ट प्रकरणात दोन वर्षे तुरुंगवास, बी. आर. शेट्टी फायरिंग प्रकरणात 10 वर्ष शिक्षा आणि बिल्डर वाजेकर खंडणी प्रकरणात दोन वर्षे शिक्षाठोठावणयात आली आहे.
तिहार कारागृहात (Tihar Jail) शिक्षा भोगत असलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन (Underworld Don Chhota Rajan) उर्फ राजन निकाळजे (Rajendra Nikalje) याला दिल्ली येथील एम्स (AIMS f) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छोटा राजन याला कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याची माहिती आहे. काही दिवसांपासून राजन निकाळजे याला कोविड 19 ( COVID Positive) विषाणूची लागण झाल्याची लक्षणे दिसू लागली होती. त्यामुळे त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. चाचणीतील अहवाल पॉजिटीव्ह आला. 26 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी छोटा राजन आणि इतर तिघांना दोन वर्षांची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. सीबीआय विशेष कोर्टाने जानेवारी 2020 मध्ये ही शिक्षा ठोठावल्यापासून राजन याचा मुक्काम तिहार कारागृहात आहे.
छोटा राजन याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. यात बिल्डर नंदू वाजेकर खंडणी प्रकरणाचाही समावेश आहे. छोटा राजन याने पनवेल येथील बिल्डर नंदू वाजेकर यांना धमकी दिली होती. वाजेकर यांनी पुणे येथील एक जागा डेव्हलप करण्यासाठी घेतली होती. दरम्यन, वाजेकर यांना ही जागा परमानंद ठक्कर नावाच्या एजंटने दिली होती. दरम्यान, या जागेच्या व्यवहारापोटी वाजेकर यांनी ठक्कर याला दोन कोटी रुपये दिले होते. मात्र, व्यवहार पूर्ण झाला नाही, असे सांगत त्याने रक्कमेची मागणी कायम ठेवली होती. या रकमेसाठी त्याने छोटा राजन या अंडर्वर्ल्ड डॉनला पुढे केले होते. या प्रकरणात बिल्डर वाजेकर यांनी पोलिसात तक्रार दिली होती. हे प्रकरण साधारण 2015 मधील आहे. या प्रकरणात छोटा राजन देषी आढळला. न्यायालयाने त्याला आणि सुरेश शिंदे, सुमित म्हात्रे आणि अशोक निकम यातिघांना या प्रकरणात शिक्षा सुनावली. पाच हजार रुपये दंड आणि तुरुंगवास अशी ही शिक्षा आहे. (हेही वाचा, Chhota Rajan Tested Covid-19 Positive: तिहार जेलमध्ये अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला कोरोना विषाणूची लागण; उपचार सुरु)
दरम्यान, छोटा राजन याच्या विरोधात 71 खटले प्रलंबीत आहेत. यात मोक्का आणि खंडणी प्रकरणातीलही गुन्हे आहेत. त्याला विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा झाली आहे. यात पत्रकार जे. डे. प्रकरणात जन्मठेप, दिल्ली एथिक बोगस पासपोर्ट प्रकरणात दोन वर्षे तुरुंगवास, बी. आर. शेट्टी फायरिंग प्रकरणात 10 वर्ष शिक्षा आणि बिल्डर वाजेकर खंडणी प्रकरणात दोन वर्षे शिक्षाठोठावणयात आली आहे.