UK कडून Covaxin चे दोन्ही डोस घेतलेल्यांना दिलासा; आता Quarantine शिवाय प्रवासाची मुभा
त्यामुळे युके मध्ये 22 नोव्हेंबरला 4 वाजल्यापासून नवा नियम लागू होईल.
ब्रिटन (Britain) कडून आता भारतीय प्रवाशांना गूड न्यूज देण्यात आली आहे. कोविशिल्ड (Covishield) पाठोपाठ कोवॅक्सिनला ( Covaxin) देखील जागतिक आरोग्य संघटनेने मंजूरी दिल्याने आता ब्रिटन मध्ये लसीचे दोन्ही डोस घेतल्यांना सेल्फ आयसोलेशन आणि टेस्टच्या निर्बंधांमधून मोकळीक मिळाली आहे. त्यामुळे युके (UK) मध्ये जाऊ इच्छिणारे भारतीय आता सोयीस्करपणे फिरू शकणार आहे. Alex Ellis, British High Commissioner to India यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे. कोवॅक्सिन चे दोन्ही डोस घेतलेल्यांना आता 22 नोव्हेंबर पासून युके मध्ये प्रवेश मिळणार आहे.
दिवाळीच्या मुहूर्तावर भारताच्या कोवॅक्सिनला WHO ने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे युके मध्ये 22 नोव्हेंबरला 4 वाजल्यापासून नवा नियम लागू होईल. कोवॅक्सिन सोबतच चीनच्या Sinovac आणि Sinopharm ला देखील WHO ने मंजुरी दिली असल्याने त्यांना देखील निर्बंधांमधून सुट मिळाली आहे. याचा फायदा युएई आणि मलेशिया मधून येणार्या प्रवाशांना देखील मिळणार आहे. नक्की वाचा: भारत बायोटेकच्या Covaxin लसीसाठी ऑस्ट्रेलियाच्या सरकारकडून मान्यता, प्रवाशांना मिळाला दिलासा.
Alex Ellis यांचं ट्वीट
युके मध्ये आता ट्रॅव्हल रूल्स अधिक सोप्पे करण्यात आले आहेत. 18 वर्षांखालील मुलांना देखील दिलासा देण्यात आला आहे. 18 वर्षांखालील ज्यांनी लस घेतलेली नाही त्यांना आता इंग्लंड मध्ये सेल्फ आयसोलेशन शिवाय प्रवेश दिला जाणार आहे.
युके मध्ये नव्या नियमावलीनुसार, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्री-डिपारचर टेस्टची गरज नाही. डे 8 ची किंवा सेल्फ आयसोलेशनची गरज नाही.