Uddhav Thackeray On Devendra Fadnavis: 'फडतूस गृहमंत्री लाळघोटेपणा करत 'फडणवीसी' करत फिरतो', उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

जो केवळ लाळघोटेपणा करत फडणवीसी करत फिरतो, अशा धारधार शब्दांमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्ला चढवला आहे.

Uddhav Thackeray | (Photo Credit: ANI)

राज्याला एक कमकूवत आणि फडतूस उपमुख्यमंत्री लाभला आहे. जो केवळ लाळघोटेपणा करत फडणवीसी करत फिरतो, अशा धारधार शब्दांमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरे यांनी आज (4 एप्रिल) रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह ठाणे (Thane) येथे रोशनी शिंदे यांची रुग्णालयात भेट घेतली. रोशनी शिंदे यांच्यावर शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. या हल्लात त्या जखमी झाल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

राज्याच्या गृहमंत्र्याचा लाळघोटेपणा इतका वाढला आहे की, त्यांच्या स्वत:च्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्यानंतर काहीही कारवाई करता येत नाही. देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्रालयाचा कारभार झेपत नसेल तर त्यांनी त्या पदावरुन बाजूला व्हावा. जेणेकरुन राज्यात जे काही सुरु आहे त्याचा ठपका त्यांच्यावर येणार नाही. राज्याच्या जनतेशी प्रामाणिक राहून त्यांनी हे करावा, असेही उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले. (हेही वाचा, Uddhav Thackeray, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे ठाण्यात, शिंदे गट समर्थकांच्या मारहाणीत जखमी रोशनी शिंदे यांची घेतली भेट)

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारबद्दल काय उद्गार काढले हे आपणास माहिती आहे. सरकारच नपुंसक म्हटल्यावर आपण आपेक्षाच कोणाकडून कारायची. ठाणे म्हणजे जीवाला जीव देणारे ठाणे. शांत आणि समृद्ध अशी ओळख असलेल्या ठाण्याची ओळख गुंड महिलांचे ठाणे अशी झाली आहे काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. न्यायालयाने नपुंसक म्हटल्यावर आता महिला गुंडांना सोबत घेऊन सोबत घेऊन हल्ले केले जात आहेत. हे सुद्धा नपुंसक पणाचेच लक्षण असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले महिलांकरवी घरात घुसून हल्ले केले जात आहेत. आम्हालाही घरात घुसता येते. पण, तसे करुन राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवायची का? तुम्हाला ते चालणार आहे का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.