J&K Encounter: कुलगाम मध्ये ठार केलेल्या बॅंक मॅनेजर विजय कुमार च्या मारेकरी दहशतवाद्याला Shopian मध्ये कंठस्नान
विजय कुमार हे राजस्थानच्या हनुमान गढाचे रहिवासी होते.
कश्मीरच्या खोर्यात हिंदूंची हत्या करण्याच्या घटना मागील काही महिन्यांत वाढल्या आहेत. अशातच एक हिंदू बॅंक मॅनेजर विजय कुमार (Vijay Kumar) यालादेखील गोळ्या मारून ठार केले होते. आज (15 जून) दिवशी सैन्याला त्याच्या मारेकर्याला कंठस्नान घालायला यश आलं आहे. Lashkar-e-Taiba च्या दोन दहशतवाद्यांपैकी एकाला आज शोपियां मधील एन्काऊंटर मध्ये कंठस्नान घातलं आहे. Jan Mohd Lone असं या मृत दहशतवाद्याचं नाव आहे.
कश्मिर खोर्यातील इतर दहशतवादी कारवार्यांसोबतच Jan Mohd Lone चा समावेश बॅंक मॅनेजरच्या हत्याकांडामध्येही होता. 2 जूनला विजय कुमार याची गोळ्या घालून कुलगाम मध्ये हत्या झाली होती. विजय कुमार हे राजस्थानच्या हनुमान गढाचे रहिवासी होते. आज शोपिया भागात झालेल्या जम्मू कश्मीर पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे.
Kashmir Zone Police ट्वीट
दहशतवादविरोधी कारवाईत एक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाल्याची माहिती आहे. श्रीनगरमध्ये सुरू झालेल्या दहशतवादविरोधी मोहिमेमध्ये, पोलिस अधिकार्यांनी दिलेल्या अहवालानुसार, आगामी अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याच्या उद्देशाने पाकिस्तान-आधारित आणि एलईटी-समर्थित दहशतवादी पाठवण्यात आले होते.