Surgical Strike 2 नंतर जम्मू-कश्मीर येथील शोपियाँ परिसरात चकमक सुरु; 'जैश ए मोहम्मद'च्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
तर भारतीय सैनेत आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सर्जिकल स्ट्राईक 2 नंतर पूर्ण पाकिस्तानात हाहाकार उडाला आहे. तर भारतीय सैनेत आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र यावरच भारतीय सेना थांबणार नाही. जम्मू काश्मीर च्या शोपियाँ जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबत चकमक सुरु आहे. भारतीय सेनेने दहशतवाद्यांना घेरले असून त्यातील दोघांना कंठस्नान घालण्यात सैनिकांना यश आले आहे. दोन्ही बाजूने अंदाधूंद गोळीबार सुरु आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, ही घटना शोपियाँ जिल्ह्यातील मेनानदर परिसरात घडली असून या भागात काही दहशतवादी लपले आहेत. या भागाला भारतीय सैनिकांना घेरले असून दहशतवाद्यांना तोडीस तोड उत्तर दिले जात आहे.
पाकिस्तानी सैनिकांनी मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या पुंछ, राजोरी आणि काही भागात सीमांचे उल्लंघन केले. भारतीय सैनिकांनी देखील पाकिस्तानच्या या चालीला चोख उत्तर दिले.