Travel Guidelines: महाराष्ट्रातून कर्नाटकात जात असाल तर 'या' गाइडलाइन्स जरुर पहा

कर्नाटकाच्या तुलनेत महाराष्ट्रात सध्या कोरोनाच्या रुग्णांचा आकडा अचानक वाढत असल्याचे दिसून येत आहे. यामुळेच कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून तेथे जाणाऱ्या नागरिकांसाठी गाइडलाइन्स जाहीर केल्या आहेत.

Coronavirus Outbreak (Photo Credits: PTI/IANS)

कर्नाटकाच्या तुलनेत महाराष्ट्रात सध्या कोरोनाच्या रुग्णांचा आकडा अचानक वाढत असल्याचे दिसून येत आहे. यामुळेच कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून तेथे जाणाऱ्या नागरिकांसाठी गाइडलाइन्स जाहीर केल्या आहेत. या गाइडलाइन्स ज्या नागरिकांना कर्नाटकात दोन किंवा तीस दिवसांसाठी जायचे असेल त्यांसाठी लागू असणार आहेत. राज्य सरकारद्वारे जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत विधानानुसार, प्रवाशांना ताप, सर्दी-खोकला किंवा घसा दुखणे, श्वास घेण्यास समस्या नसल्या पाहिजेत.(Bharat Biotech ची पार्टनर कंपनी Ocugen ने अमेरिकेमध्ये 18 वर्षांखालील मुलांना Covaxin देण्यासाठी Emergency Use Authorisation साठी अर्ज)

गाइडलाइन्सनुसार, कर्नाटकात जर महाराष्ट्रातील नागरिक प्रवेश करतील तसे त्यांना थर्मस स्क्रिनिंग करावी लागणार आहे. त्याचसोबत कोविडची लस घेतल्याचे प्रमाणपत्र सुद्धा सोबत घेऊन जावे. त्याचसोबत प्रवाशांनी फेस मास्क घालणे अनिवार्य असणार आहे. कमी वेळासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार नाही आहे.(UK कडून Covaxin चे दोन्ही डोस घेतलेल्यांना दिलासा; आता Quarantine शिवाय प्रवासाची मुभा)

तर कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. त्यामुळे नागरिकांना वारंवार नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. विविध राज्यात कोरोनाची परिस्थिती पाहून काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी सुद्धा दिली गेली आहे. त्याचसोबत नागरिकांनी सुद्धा घराबाहेर पडताना स्वत:सह दुसऱ्यांना आपला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, भारतात गेल्या 24 तासात कोरोनाचे आणखी 10126 रुग्ण आढळले आहेत. तर 332 जणांचा बळी गेला असून अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ही 1,40,638 वर पोहचल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

Right to Die With Dignity: 'सन्मानाने मरण्याचा अधिकार'; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाची अंमलबजावणी करणारे कर्नाटक ठरले पहिले राज्य, जाणून घ्या काय सांगतो कायदा

WHO New Guidelines: WHO ने उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी नियमित मीठाऐवजी पोटॅशियमयुक्त मीठाच्या पर्यायांची शिफारस करणारी नवीन मार्गदर्शक तत्त्वे केले जारी

Hubballi Shocker: कर्नाटकातील हुबळी येथे पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या; घटस्फोटाचा अर्ज करून करत होती 20 लाख रुपयांची मागणी

Karnataka Doctor Kidnapping: कर्नाटकमध्ये डॉक्टरला उचलणे अपहरणकर्त्यांना पडले महागात; 6 कोटी खंडणी मागितली पण, पोलीस मागे लागताच 300 रुपये देऊन डॉक्टरला सोडावे लागले

Share Now