TRAI कडून नवं वर्षाच ग्राहकांना गिफ्ट, आता 130 रुपयांत मिळणार 200 फ्री चॅनल्स
ट्रायने युजर्ससाठी केबल धारकांसाठी एक नवे टॅरिफ प्लॅन लॉन्च केले आहेत. ट्राय त्यांच्या युजर्सला नेहमीच खिशाला परवडतील असे टॅरिफ प्लॅनची सुविधा उपलब्ध करुन देत असतात.
TRAI यांनी केबल टीवी धारकांना नव्या वर्षाचे गिफ्ट दिले आहे. ट्रायने युजर्ससाठी केबल धारकांसाठी एक नवे टॅरिफ प्लॅन लॉन्च केले आहेत. ट्राय त्यांच्या युजर्सला नेहमीच खिशाला परवडतील असे टॅरिफ प्लॅनची सुविधा उपलब्ध करुन देत असतात. हे नवे टॅरिफ प्लॅन दर 1 मार्च 2002 पासून लागू होणार आहेत. यापूर्वी युजर्सला 130 रुपयांत 100 फ्री टीवी चॅनल्स पाहण्याची संधी मिळत होती. मात्र आता 130 रुपयांच्या प्लॅनमध्ये 200 फ्री चॅनल्स पहायला मिळणार आहे. त्याचसोबत ट्रायने 12 रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेल्या चॅनल्सला बुक लिस्टच्या बाहेर ठेवण्यास सांगितले आहे. हे चॅनल्स ग्राहक त्यांच्या मतानुसार खरेदी करु शकतात.
ट्रायने गेल्या वर्षात टॅरिफ व्यवस्था लागू केली होती. त्यानुसार ग्राहकांना त्यांच्या पसंदीचेच फक्त चॅनल्स पाहता येणार होते. मात्र त्यावेळी ग्राहकांना त्यांना जे चॅनल्स पहायचे नाहीत त्यासाठी सुद्धा पैसे द्यावे लागत होते. नवी व्यवस्था लागू झाल्यानंतर ग्राहकांना 130 रुपयांसह टॅक्स प्रति महिन्यासाठी आकारले जात होते. त्यामध्ये ग्राहकांना 100 चॅनल्स फ्री पहायला मिळत होते.(फ्री कॉलिंग नंतर आता फ्री डाटा प्लानवरही लगाम लागण्याची शक्यता, TRAI ने टेलिकॉम कंपन्यांना दिल्या सूचना)