भारतात गेल्या 24 तासांत COVID-19 चे 227 नवीन रुग्ण, देशात रुग्णांची संख्या 1251 वर
यात 1117 उपचार घेत असलेले रुग्ण, 102 डिस्चार्ज मिळालेले आणि 32 मृत्यू झालेल्यांचा समावेश आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ही आकडेवारी खूपच धक्कादायक असल्याचे सांगण्यात येत आहे.
कोरोना व्हायरसचे (Coronavirus) लोण जगभरात अगदी झपाट्याने पसरत असून रुग्णांची संख्या मिनिटागणिक वाढत चालली आहे. यात भारताची परिस्थितीही काही वेगळी नाही. आज दिवसाअखेरीस भारतात कोरोना ग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली असून गेल्या 24 तासांत भारतात 227 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे भारतात (India) कोरोना ग्रस्तांचा आकडा 1251 वर जाऊन पोहोचला आहे. यात 1117 उपचार घेत असलेले रुग्ण, 102 डिस्चार्ज मिळालेले आणि 32 मृत्यू झालेल्यांचा समावेश आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ही आकडेवारी खूपच धक्कादायक असल्याचे सांगण्यात येत आहे.
देशभरात लॉकडाऊन असले तरीही कोरोना व्हायरस रुग्णांच्या संख्येत वाढ होतच चालली आहे. त्यात गेल्या 24 तासांत भारतात 227 नवे रुग्ण आढळल्याची नवी माहिती मिळाली आहे. महाराष्ट्रात एकूण रुग्णांची 216 वर गेली असून मुंबईतील रुग्णांची संख्या 170 वर पोहोचली आहे.
ANI चे ट्विट:
हेदेखील वाचा- सावधान! कोरोनाबाधीत रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या 17 जणांना COVID-19 ची लागण
Here is The Statewise list of COVID-19 Cases in The Country:
S. No. | Name of State / UT | Total Confirmed cases * | Cured/Discharged/Migrated | Death |
1 | Andhra Pradesh | 23 | 1 | 0 |
2 | Andaman and Nicobar Islands | 9 | 0 | 0 |
3 | Bihar | 15 | 0 | 1 |
4 | Chandigarh | 8 | 0 | 0 |
5 | Chhattisgarh | 7 | 0 | 0 |
6 | Delhi | 87 | 6 | 2 |
7 | Goa | 5 | 0 | 0 |
8 | Gujarat | 69 | 1 | 6 |
9 | Haryana | 36 | 18 | 0 |
10 | Himachal Pradesh | 3 | 0 | 1 |
11 | Jammu and Kashmir | 48 | 2 | 2 |
12 | Karnataka | 83 | 5 | 3 |
13 | Kerala | 202 | 19 | 1 |
14 | Ladakh | 13 | 3 | 0 |
15 | Madhya Pradesh | 47 | 0 | 3 |
16 | Maharashtra | 198 | 25 | 8 |
17 | Manipur | 1 | 0 | 0 |
18 | Mizoram | 1 | 0 | 0 |
19 | Odisha | 3 | 0 | 0 |
20 | Puducherry | 1 | 0 | 0 |
21 | Punjab | 38 | 1 | 1 |
22 | Rajasthan | 59 | 3 | 0 |
23 | Tamil Nadu | 67 | 4 | 1 |
24 | Telengana | 71 | 1 | 1 |
25 | Uttarakhand | 7 | 2 | 0 |
26 | Uttar Pradesh | 82 | 11 | 0 |
27 | West Bengal | 22 | 0 | 1 |
Total number of confirmed cases in India | 1251 | 102 | 3 |
जगभरात कोरोनाबाधीतांची संख्या 6 लाख 81 हजार 706 वर पोहचली आहे. यांपैकी 31 हजार 882 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 45 हजार 696 रुग्ण बरे झाल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेत कोरोना रुग्णांचा आकडा 1,61,947 वर जाऊन पोहोचला आहे. तर इटलीत हा आकडा 1,05,789 वर जाऊन पोहोचला आहे. तसेच स्पेनमध्ये 90,280 कोरोना ग्रस्तांची सख्या झाली आहे.
दिवसागणिक अमेरिकेमध्ये कोव्हिड 19 या आजाराने मृत्यूमुखी पडणार्यांचा संख्या वाढत आहे. अशामध्येच लॉकडाऊनला विरोध करणार्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेमध्ये सोशल डिस्टन्सिंगची कालमर्यादा 30 एप्रिल पर्यंत वाढवत असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान जितकं सोशल डिस्टन्सिंग पाळाल तितकं आपण या महासंकटातून लवकर बाहेर पडू शकतो असा विश्वास त्यांनी जनतेला दिला आहे.