तुरडाळीचे भाव चक्क 100 रुपांच्या घरात, सामान्य नागरिकांना बसणार फटका
सध्या तुरडाळीचे (Toor Dal) भाव वाढत चालले असून ते आता शंभर रुपयापर्यंतच्या घरात जाऊन पोहचले आहे.
सध्या तुरडाळीचे (Toor Dal) भाव वाढत चालले असून ते आता शंभर रुपयापर्यंतच्या घरात जाऊन पोहचले आहे. यामुळे आता सामान्य नागरिकांना फटका बसणार आहे. दीड महिन्यात क्विंटलमागे दोन हजार रुपयांची वाढ करण्यात आली असून घाऊक बाजारात दर्जानुसार डाळींचे भाव वाढवण्यात आले आहेत. तुरडाळ प्रति किलोसाठी 85 ते 87 रुपये झाले आहेत.
त्याचसोबत किरकोळ बाजारात तुरडाळीचे भाव हे 90 ते 95 रुपयांच्या घरात जाऊन पोहचले आहेत. गेल्या काही वर्षात तूरडाळीचे भाव 200 रुपयापर्यंत जाऊन पोहचले होते. याचा फटका मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांना झाला होता.(डाळी महागल्या - प्रतिकिलो 10 ते 15 रुपयांची वाढ)
तर सध्या अनेक तुरडाळ मिल सुद्धा बंद झाल्या आहेत. परंतु त्याचा परिणाम तुरडाळीच्या साठ्यावर झाला आहे. त्यामुळे या वर्षीसुद्धा तुरडाळीचे उत्पन्न कमी झाल्याने त्याचे भाव वाढले आहेत.