Toolkit Case: दिल्ली पोलीस टूलकिट प्रकरणात ट्विटरच्या गुरुग्राम, लाडो सराय येथील कार्यालयात
दिल्ली पोलिसांचे पीआरओ चिन्मय विस्वाल यांनी म्हटले आहे की, टूलकिट प्रकरणात ट्विटरजवळ अशी कोणतीह माहिती आहे जी दिल्ली पोलिसांना माहिती नाही. ही माहिती या प्रकरणाच्या तपासासाठी आवश्यक आहे. त्यामुळे पोलिसांनी ट्विटरच्या कार्यालयाची तपासणी केली.
कोरोना व्हायरस (Coronavirus) मुद्द्यावरुन ट्विटर टूलकिट प्रकरण (Toolkit Case) देशभर गाजते आहे. या प्रकरणात दिल्ली पोलीसांनी (Delhi Police) तपासाचा वेग वाढवला आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या एखा विशेष पथकाने मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर (Twitter Office) कार्यालयावर छापा मारला आहे. दिल्ली पोलिसांचे एक विशेष पथक ट्विटर इंडियाच्या (Twitter India) दिल्ली येथील लाडो सराय (Lado Sarai) आणि हरियाणामधील गुरुग्राम (Gurugram) परिसरातील कार्यालयात पोहोचले. दिल्ली पोलिसांनी ह कारवाई आज (24 मे) सायंकाळी केली. दिल्ली पोलिसांनी ट्विटर इंडियाला या आधीच नोटीस पाठवली होती. त्यानंतर आता कार्यालयावर छापाही टाकला आहे.
टूलकिट प्रकरणात ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टखाली मॅनिप्यूलेटेड मीडिया असे लिहिल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणात पोलिसांच्या विशेष विभागाने ट्विटरला नोटीस पाठवून उत्तर मागितले होते. प्राप्त माहितीनुसार दिल्ली पोलिसांनी ट्विटरला विचारले आहे की, त्यांच्याजवळ अशी कोणती माहिती आहे ज्याच्या आधारे ते संबित पात्रा (Sambit Patra) यांच्या ट्विटला मॉनिप्युलिटेड म्हणत आहेत. दिल्ली पोलिसांनी अशा प्रकारची नोटीस ट्विटरला सोमवारी (17 मे) पाठवले होते. याच प्रकरणात दिल्ली पोलिसांनी आता ही कारवाई केली आहे.
दिल्ली पोलिसांचे पीआरओ चिन्मय विस्वाल यांनी म्हटले आहे की, टूलकिट प्रकरणात ट्विटरजवळ अशी कोणतीह माहिती आहे जी दिल्ली पोलिसांना माहिती नाही. ही माहिती या प्रकरणाच्या तपासासाठी आवश्यक आहे. त्यामुळे पोलिसांनी ट्विटरच्या कार्यालयाची तपासणी केली. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात तक्ररदार आणि तक्रारीच्या आशयाबाबत माहिती दिली नाही. (हेही वाचा, Toolkit Case: छत्तीसगढ पोलिसांकडून भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांना धाडली नोटीस)
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांना एका विशेष पथकाने लाडोसराय येथील कार्यालय बंद मिळाले. ज्यानंतर पोलिसांचे हे विशेष पथक परत आले. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, विशेष पथकाचा आणखी एक गट ट्विटरच्या गुरुग्राम येथील कार्यालयावरही पोहोचली. दिल्ली पोलिस टूलकीट प्रकरणात ट्विटरच्या भूमिकेचा तपास करत आहेत.
एएनआय ट्विट
दरम्यान, भाजपने काँग्रेसवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी एक टूलकिट क्रिएट केल्याचा आरोप केला आहे. भाजपचा आरोप आहे की काँग्रेसने कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या स्ट्रेनला मोदी स्ट्रेन (Modi Strain) नावाने प्रसीद्ध करत देशाला बदनाम करण्याचे कारस्थान रचले. भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांच्या ट्विटला मेनिपुलेटेड मीडिया (manipulated media) असा टॅग ट्विटरने लावला. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाईट ट्विटर ला नोटीस पाठवली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)