Tina Ambani: फेमा उल्लंघनप्रकरणी टीना अंबानी ईडी कार्यालयात दाखल
उद्योगपती अनिल अंबानी यांची परकीय चलन विनियम कायद्याच्या उल्लंघन प्रकरणात सोमवारी ईडीच्या मुंबई कार्यालयात चौकशी करण्यात आली.
परदेशी चलन व्यवस्थापन कायद्याची (FEMA) पायमल्ली केल्याप्रकरणी काल उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani)यांची तब्बल आठ तास चौकशी करण्यात आली होती आणि आज त्यांच्या पत्नी टीना अंबानी (Tina Ambani) ईडीसमोर हजर झाल्या आहेत. अनिल अंबानींच्या कंपन्यांमधील गुंतवणुकीशी संबंधित हे प्रकरण आहे. 64 वर्षीय अनिल अंबानी यापूर्वी 2020 मध्ये येस बँकेचे प्रवर्तक राणा कपूर आणि इतरांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झाले होते. (हेही वाचा - Dombivli Station परिसरात वाहतूक कोंडीवर ट्राफिक विभागाचा नवा तोडगा; 50 मीटर अंतरावर रिक्षांना मज्जाव)
उद्योगपती अनिल अंबानी यांची परकीय चलन विनियम कायद्याच्या उल्लंघन प्रकरणात सोमवारी ईडीच्या मुंबई कार्यालयात चौकशी करण्यात आली. अनिल अंबानी हे सकाळी दहाच्या सुमारास ईडी कार्यालयात हजर झाले होते. त्यानंतर तब्बल सात आठ तासांनंतर ते ईडी कार्यालयातून बाहेर पडले होते. आज टीना अंबानी यांची चौकशी किती तास होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ऑगस्ट 2022 मध्ये स्विस बँकेतील खात्यात 814 कोटींच्या ठेवी दडवून ठेवत 420 कोटींची कर चुकवेगिरी केल्याच्या आरोपाखाली आयकर विभागानं अनिल अंबानींना 8 ऑगस्ट 2022 रोजी नोटीस पाठवली होती. मात्र कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी दहा वर्षांपूर्वी झालेल्या व्यवहारांबाबत ही नोटीस कशी पाठवता येईल, असा दावा करत अंबानींनी त्याला हायकोर्टात आव्हान दिलं आहे. या नोटीशीत आयकर विभागानं आरोप केला होता की, परदेशातील बँकेत लपवून ठेवलेल्या या संपत्तीची माहिती जाणूनबूजन भारतीय प्राप्तीकर खात्याला दिली नाही. त्यामुळे ब्लॅक मनी संदर्भातील कायद्याच्या कलम 50 आणि 51 अनिल अंबानींनीवर कारवाई का करण्यात येऊ नये?, ज्यात दोषी आढळल्यास 10 वर्षांची कैदही होऊ शकते. अशी विचारणा करण्यात आली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 04, 2023 03:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

