TIME मॅगझिन ची पहिली Kid Of The Year ठरली भारतीय वंशाची Gitanjali Rao, वयाच्या 15 व्या वर्षात गाठली यशाची पायरी

प्रसिद्ध TIME मॅगझिनने 'किड ऑफ द इअर'चा (Kid Of The Year) किताब भारतीय-अमेरिकन वंशाची गितांजली राव (Gitanjali Rao) हिला मिळाला आहे. टाइमने त्यांच्या Cover Page वर 15 वर्षाच्या गीतांजलीला जागा दिली आहे.

गितांजली राव (Photo Credits-Twitter)

प्रसिद्ध TIME मॅगझिनने 'किड ऑफ द इअर'चा  (Kid Of The Year) किताब भारतीय-अमेरिकन वंशाची गितांजली राव (Gitanjali Rao) हिला मिळाला आहे. टाइमने त्यांच्या Cover Page वर 15 वर्षाच्या गीतांजलीला जागा दिली आहे. गीतांजली राव ही एक सर्वसाधारण मुलगी नसून तिने आपल्या अवघ्या 15 व्या वर्षात असे काही केले आहे ते पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. गीतांजली ही एक वैज्ञानिक आणि इनोवेटर आहेत. टाइम मॅगझिनसाठी हॉलिवूड सुपरस्टार अँजोलिना जोली हिने गीतांजलीचा इंटरव्यू घेतला.

टाइम मॅगझिनने पहिल्यांदाच किड ऑफ द इअरसाठी नॉमिनेश मागवले होते. यासाठी जवळजवळ 5 हजार नॉमिनीजला निवडण्यात आले होते. ज्यामध्ये गीतांजली हिने पहिले स्थान प्राप्त केले असून तिचा फोटो टाइम मॅगझिनच्या कव्हर पेजवर छापला गेला आहे. गीतांजली हिने नुकत्याच अमेरिकेच्या टॉप यंग साइंटिस्टचा अवॉर्ड ही मिळवला होता.(NASA Alert: चिंताजनक! वर्षाअखेरीस अंतराळातून पृथ्वीवर येणार आणखी एक संकट; नासाकडून इशारा)

तर गीतांजली हिने असे एक सेंसर बनवले आहे ज्यामध्ये पाण्यातील लेडचे प्रमाण अत्यंत सहजपणे कळू शकणार आहे. त्याचसोबत ही मोठी गोष्ट आहे की, यामध्ये कोणतेही महागड्या डिवाइसचा वापर करण्यात आलेला नाही. हे डिवाइस एका मोबाईल प्रमाणे दिसते. याचे नाव गीतांजली हिने टेथिस असे ठेवले आहे. पाण्यात काही सेकंदापर्यंत टाकल्यानंतर डिवाइससोबत कनेक्ट अॅप काही वेळात असे सांगते की, पाण्यात किती प्रमाणात लेड आहे. आता गीतांजलीच्या या प्रोटोटाइपवर अमेरिकेचे वैज्ञानिक ही काम करत आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now